कवि मन पुन्हा जागी झालं

Started by sunitsonnet, June 25, 2021, 03:59:13 PM

Previous topic - Next topic

sunitsonnet


भातुकलीच्या खेळामधली राजा आणिक राणी
अर्ध्यावरती डाव मोडला, अधूरी एक कहाणी

हे गीत माझ्यासाठी तर लिहिलं गेलं नाही ना असच वाटतं. १९९४ पारून आजपर्यंत हे गीत माझं जीवन गाणं केव्हा झालं हे मलाच कळलं नाही. आजपर्यंत लाखो वेळा हे गाणं ऐकलंय. करोडो अश्रू ढाळलेत. हतबलता काय असते याच जिवंत उधाहरण मी च आहे.

कवि मन पुन्हा जागी झालं
पुन्हा कविता करायला लागलं

पूर्वी प्रेम कविता करू लागलेलं
आता विरह गीत लिहायला लागलं

याला सर्वस्वी मीच जबाबदार
मग कोणावर रागे भरणार

रागे भरण्याचा पूर्ण अधिकार
तिचाच तर असणार

कवितांचा मीच गीतकार
मीच श्रोता असणार

एकदा तरी माझी कविता वाचणारं
माझ प्रेम पुन्हा डोकावणार?

-स्वरचित
सुनीत Sonnet

Atul Kaviraje

"भातुकलीच्या खेळामधली राजा आणिक राणी
अर्ध्यावरती डाव मोडला, अधूरी एक कहाणी"

"हे गीत माझ्यासाठी तर लिहिलं गेलं नाही ना असच वाटतं. १९९४ पारून आजपर्यंत हे गीत माझं जीवन गाणं केव्हा झालं हे मलाच कळलं नाही. आजपर्यंत लाखो वेळा हे गाणं ऐकलंय. करोडो अश्रू ढाळलेत. हतबलता काय असते याच जिवंत उदाहरण मीच आहे."

   सुनीत (Sonnet) सर, वरील कवितेच्या पंक्ती वाचून आपलं हळवं मन हे पुन्हा भूतकाळात सिंहावलोकन करू लागलं, हे आपल्या उपरोक्त लेखावरून लक्षात येत. "कवि मन पुन्हा जागी झालं". या विरह कवितेतून आपण आपल्या भूतकाळातील जीवनाचा स्पष्ट उल्लेख केला आहे. एक सुप्त कवी ,नव्याने रूप धारण करून पुन्हा लिहू पाहात होता. कविता लहान पण त्यातील अर्थ महान भासला.

     कवितेत खंड जरूर पडतो
     पण कविता कधी  मरत नाही
     आठवणींचा दर्पण सामोरी येता,
     पुन्हा ती जिवंत होई.

      सुप्त मनात जपलेल्या आठवणी
      पुन्हा उभारी घेऊ लागतात
      हळव्या कवीच्या कवी-मनाला,
      त्या पुन्हा शब्द देऊ लागतात.

-----श्री अतुल एस परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-27.06.2021-रविवार.