नवल-वास्तव कविता - "दुधाला मिळावा योग्य दर , दूध ओतले रस्त्यावर"

Started by Atul Kaviraje, June 26, 2021, 02:02:58 AM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

मित्र/मैत्रिणींनो,

      अतिशय, सुन्न करणारी बातमी गेल्या आठवड्यात यु -ट्यूब वर पाहावयास, ऐकावयास मिळाली.दुधाला योग्य दर मिळत नाही,म्हणून महाराष्ट्रात जागो-जागी दुधाचे कॅन च्या कॅन रस्त्यावर ओतण्यात आले. कितीतरी लिटर दूध या दूध-ओत कार्यामुळे माती-मोल झाले होते. अक्षरशः फुकट गेले होते.

     काय झालयं या महाराष्ट्राच्या दूध विक्रेत्यांना, कि त्यांनी हे अमृता-सम दूध हे कवडीमोलासम ओतून टाकावे. दुधाची दर-वाढ व्हावी, त्यास योग्य तो दर मिळावा, म्हणून अजूनही कितीतरी आंदोलनाचे मार्ग आहेत. त्याद्वारे ते आपला बहिष्कार, संप पुकारू शकतात. पण दूध रस्त्यावर ओतणे म्हणजे, कल्पनाच करवत नाही.

     महाराष्ट्रात, लाखो मुले, गरीब क्षेत्रात मोडतात, की ज्यांना त्यांचे पालक त्यांना  नीट जेवण काय तर दूध ही देऊ शकत नाहीत. अश्या अनेक मुलांचा तोंडचा घास हे दूध-विक्रेते, हिरावून घेत आहेत कि नाहीत? हेच फुकट गेलेले दूध जर गरिबांना मिळाले असते, किंवा तत्सम कामासाठी, उपयोगी आले असते तर ते फायदेशीरच ठरले असते. पण नाही, दुसरा मार्गच यांना सुचत नाही. यापुढे हि दुर्बुद्धी त्यांना न सुचो, हीच मनोकामना करीत मी आपणापुढे पुढील कविता सादर करीत आहे. माझ्या कवितेचे शीर्षक आहे - "दुधाला  मिळावा  योग्य  दर , दूध  ओतले  रस्त्यावर"

                            नवल-वास्तव कविता
          "दुधाला  मिळावा  योग्य  दर , दूध  ओतले  रस्त्यावर"
          -------------------------------------------------

गो-माता ही काम-धेनूच जणू
पूज्य तिचे स्थान जनी मनी
पवित्र कार्यास गाय असे मंगल,
व्हावया  दूर सारे अमंगल.

दुग्ध तिच्या आचळामधील आहे
शुभ्र, धारोष्ण अमृतच जणू
सात्त्विक, बलशाली, औषध युक्त
व्हावे पिऊन साऱ्यांनी रोग-मुक्त.

अश्या अमृतासम  दुधाचे हाल
आज नाही पाहावत डोळ्यांनी
मातीमोल झालेय, विषच जणू,
रस्त्यावर ओतून टाकलंय विक्रेत्यांनी.

योग्य दर नाही दुधास
वाढीव भाव नाही दुधास
ओतून टाकती टँकरच्या टँकर,
विनाशच दिसतोय कृतीतून अति-भयंकर.

गरिबांच्या मुलांना एक वेळचे
जेवण नाही, त्यांचे नशिबी
निदान दुधाने तरी भूक भागावी,
फसवतेय त्यांना त्यांची गरिबी.

हास्य मुखावर विलसले असते
दुधाचे दर्शन जर झाले असते
समाधान त्यांच्या मनीचे, मुखाने
आशीर्वाद रुपी आले असते.

आपलेच नुकसान,आपलाच तोटा
अश्या कामाने होतोय घाटा
दुजेही मार्ग असती आंदोलनाचे,
न्याय मिळाया त्यांच्या मागण्यास.

अयोग्य न घडावी यापुढे कृती
विचार व्हावा, टाळावी कुमती
दुधाचा अपव्यय न होता
मिळतील त्यांना उत्तम किमती.


-----श्री अतुल एस परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-26.06.2021-शनिवार.