स्वप्न-प्रेम कविता - "तुझ्याच स्वप्नात रंगले मी"

Started by Atul Kaviraje, June 27, 2021, 06:13:56 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

मित्र/मैत्रिणींनो,

     माझ्या कवितेतील प्रेमिका, तिच्या प्रियकराच्या स्वप्नात रंगून गेली आहे, दंग झाली आहे. तिला परिस्थितीचे ,आजूबाजूचे भान राहिलेलं नाही, तिला त्याच्या मिठीत असल्याचा भास होत आहे. पण प्रत्यक्षात ती जेव्हा डोळे उघडून पहाते, तेव्हा तिला हे स्वप्न आहे कि सत्य, याचाच संभ्रम पडतो, कारण ती साक्षात तिच्या प्रियकराच्या मिठीतच असते.

     पण नाही, मला डोळेच उघडायचे नाहीत, मला त्या सुख-स्वप्नांतच दंग होऊ दे, स्वप्नातच साजण्याच्या मिठीत सामावून घेऊ दे, असे ती मनास समजावीत आहे. आणि आयुष्यभर मला या स्वप्नातच जगू दे, असं ही ती म्हणत आहे . ऐकुया तर या स्वप्न-सागरात मनसोक्त डुंबत असलेल्या प्रेमिकेची ही स्वप्न - प्रेम कविता. कवितेचे शीर्षक आहे - "तुझ्याच स्वप्नात रंगले मी "

                    स्वप्न-प्रेम कविता
               "तुझ्याच स्वप्नात रंगले मी"
               ----------------------

साजणा, तुझीच स्वप्ने पाहत होते
तुझ्या स्वप्न-प्रेमात मी दंग होते
अवचित नयन उघडता नवल घडले,
साक्षात तुझ्या मिठीत मी उभी होते.

अजुनी अर्धोन्मीलित नेत्र माझे
त्या आवडत्या धुंदीत विसावलेत
ही तुझी मिठी, हा तुझा स्पर्श,
अजुनी मला स्वप्नवत भासताहेत.

नको करूस आग्रह डोळे उघडण्याचा
असेच मला तुला पाहू दे
तुझ्या हाताची कव माझ्या कटीभोवती,
अशीच आयुष्यभर राहू दे.


-----श्री अतुल एस परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-27.06.2021-रविवार.


   

Kiran rajeandra chavan

तिला भेटण्याची आस मज होती खूप...
तिनेच भेटीचा दिला निरोप...

येण्याची तिच्या चाहूल लागताच काळीज धड धाड करू लागल......
पाहताच तिला मन गालातल्या गालात लाजल...