कृष्ण-दुनिया वास्तव कविता-"काळ्या जगताचे कारभार काळे"

Started by Atul Kaviraje, June 27, 2021, 07:26:48 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

मित्र/मैत्रिणींनो,

     "अंडर-वर्ल्ड" हा शब्द तुम्हाला परिचित असेलच, त्याचा शुद्ध मराठी अनुवाद म्हणजे, "काळे जगत". तर हे काळे जग आपल्या नेहमीच दृष्टीच्या बाहेर असते, या जगतात काय काय चालतंय याचा आपल्याला जराही अंदाज नसतो. आणि तो नसलेलाच बरा. त्यापासून दूरच राहिलेले बरे. या काळ्या जगताचे सारे कारभार हे नेहमीच काळे असतात, त्याला शुभ्रतेचा वाराही कधी लागत नाही. तेथे प्रकाशाचा नेहमीच अभाव असतो.

     तिथले जगच वेगळे असते, ती फक्त काळ्या पैश्यांची दुनिया असते, तिथले हात हे नेहमीच रक्ताने बरबटलेले असतात. असे हे काळ्या बुरख्यातील सूत्रधार, काळ्या पडद्या-आडून, आपले हे काळे कारभार, या काळ्या जगातून चालवीत असतात. तर अश्या या काळ्या-कुट्ट, जहाल विषारी जाळ्यात न अडकलेलेच बरे, प्रस्तुत कविता ही याच विषयावरील आहे, कवितेचे शीर्षक आहे - "काळ्या जगताचे कारभार काळे"

                          कृष्ण-दुनिया वास्तव कविता
                          -----------------------                       

=================
काळ्या जगताचे कारभार काळे
=================


नाही वाव येथे प्रकाशास
नाही जिवंतपणा, नाही उल्हास
कर्दमात रुतवणारे काळे कुट्ट जाळे,
काळ्या जगताचे कारभार काळे.

बरबटलेल्या हाताना दुर्गंध पैश्यांचा
रक्तबंबाळ हाताना चटका रक्ताचा
विखारी दुनियेतले विषारी-सर्प सगळे,
काळ्या जगताचे कारभार काळे.

सूत्रधार पडद्यामागील, काळ्या बुरख्यातले
आहेत प्रतिष्ठित, हाय -फाय समाजातले
राजरोस वावरती ताठ मानेने,
हलाहल काळे कुट्ट पचवून, क्रूर मनाने.

इथल्यांपेक्षा त्यांचे जगच वेगळे
सुटकेस असती तयार, काळे-कावळे
पैसाच काम करतोय सगळे,
काळ्या जगताचे कारभार काळे.

परि नाही सुटका इथे मरणा वाचून
मारले जातात इथे वेचून-वेचून
पाहाणाऱ्यांचेही जातात पाणावले डोळे,
सार दिसूनही जग झालंय आंधळे.


     मित्रानो, कुठेतरी या गोष्टीना आळा हा बसावयास हवा, असे मला वाटत.


-----श्री अतुल एस परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-27.06.2021-रविवार.