पाऊसओळी संग्रह

Started by कदम, June 30, 2021, 01:28:48 PM

Previous topic - Next topic

कदम

१)
नभ येते भरून
आकाश गर्द दाटून
वारा वाहतो गारठून
असा ऋतू वरूण

२)
प्रेम म्हणजे
पाण्यावरती होडी
प्रेम म्हणजे
जीवनातील गोडी

३)
हृदयाचे केले पाणी
प्रेम कळले नाही
दुष्काळ असला तरी
पाऊस थांबला नाही

४)
पाऊस पडतो
रिमझिम रिमझिम
थेंबाचे स्वर
टिपटीप टिपटीप

५)
नभ आले अवकाशी
नभ आले अवकाशी
पाऊस धारा भेटली
कोरड्या कोरड्या मातीशी

६)
ओले ओले झाले
पाणी पाणी झाले
पाऊस आला इथे
भुमीस प्रसन्न केले

७)
ओढा भरून वाहतो
पाऊस जेंव्हा येतो
आनंद व्यक्त करीत
बैलपोळा साजरा होतो

८)
कधी भरते अथांग नदी
कधी आटते सताड नदी
पाऊस तेवढा आहे गुणी
जो शेतकर्याची काळजी करी

९)
काळ्या काळ्या ढगांमधूनी
नभ घालतो शिळ
मला नाही सापडत
घरावीना कुठलेच बीळ

१०) हे वरूण देवा
प्रकट हो आता
तु नाही घरी
खरीप आला दारा

११)
झाडे हलती
पाने हलती
नभ येता
धरणी फुलती

१२)
सर सुखाची श्रावणी
पाऊस पावणा
धरणी पावणी

१३)
वाळल्या वाळल्या झाडाशी
पाऊस धारा भिडल्या
निसर्ग चातकाला या
जीवन सरिता लाभल्या

१४)
जल कि राणी
बारीश होती है
जीवन की सरिता
बारीश लाती है ॥

१४)
कळल्या कळल्या पावसा
तुझ्या भावना कळल्या
तुम्ही उन्हाळ्याची सांगता
मुसळधार वाहून करता

१५)
पावासामध्ये भिजून माझे
अंग झाले ओले
धरणीस रंग आले
झाले निसर्गप्रेमी ताजे

१६)
पावूस पावूस पावूस
लावला आम्ही उस
तुमचे झाले आगमन
धरणीने बदलली कुस

१७)
हे मेघ राजा
हे मेघ मल्हारा
तुझी आठवण काढी
बघहा निसर्ग पसारा

१८)
शोषले जाते पाणी
जमिनी द्वारे पावसाचे
किती गं बाई नवल
करावे या निसर्गाचे

१९)
गवत झाले चिंब
भिडला तृण अंकुरास
वर्षा ऋतु करितो
पाल्लवीत या कुरणास

२०)
कसा ह्यो हेवा
करी वर्षा ऋतू
सृष्टी सवे आपण
पावसा मध्ये भिजू

२१)
उष्णतेचा घात झेलत
सर्व भुमाता होती
पाऊस अवतरला कोसळला
भुमीविकास पोषक झाली

२२)
कोरड्या कोरड्या आभाळाला
काजळ लावले सृष्टीने
यंदा भरपुर पाऊस
होणार माझ्या दृष्टीने

२३)
नदी नाले धबधबे
वाहतात बरका भरून
उस्मानाबादचे लोक जगतात
पावसावरचे शेत करून

२४)
धाराशीवला यंदा पाऊस
टिसभरच पडला रं
कोरोनाच्या संकटाने तो
खरोखरच हळहळला रं

२५)
अरे देवा निसर्गाचे
काय पुरवावे डोहाळे ?
तडतड तडतड कडकडतात
घरावरचे पञे पन्हाळे

२६)
पाऊसाच्या मी लय
मारत होतो गप्पा
आभाळ पुढंपुढं जातं
सोडून उस्मानाबादचा पट्टा

२७)
अर्रर पाऊसाचा मंञ
कोणी थोडा फुकाहो
पाऊस बसला दडून
येरेयेरे पावसा म्हणाहो
✔✔✔✔✔✔✔✔
कदम.के.एल.(कुमार्कवी)