वास्तव-वादी कटू-सत्य कविता-" गॅस महागला, रौकेल महागले "

Started by Atul Kaviraje, July 01, 2021, 01:32:51 AM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

मित्र/मैत्रिणींनो,

     माझी प्रस्तुत कविता, ही एका कटू-सत्यावर आधारित आहे. महागाई दिवसेंदिवस वाढतच आहे. तिचा राक्षस, भस्मासुर सर्वांना अक्षरशा गिळू पहातोय. पण, मित्रानो, या महागाईची झळ फक्त गरिबांनाच लागतेय, पोचतेय ,असं दिसत. त्यांच्या सामान्य गरजा, म्हणजे गॅस, रौकेल इत्यादी इंधन, ज्यावर ते स्वयंपाक करून जेवतात, पोटाची खळगी भरतात. पण समजा तेच महाग झाले तर ? तर त्यांनी खायचे काय ?  हा प्रश्न उद्भवतोच.

     श्रीमंत हा श्रीमंत आणि गरीब हा गरीबच असतो, पण ही परिस्थिती  भविष्यात  केव्हा न केव्हातरी निवळेलच. गरिबांनाही दिवस चांगले येवोत, अशी आशा करूया. तर ऐकुया, ही वास्तव-वादी कटू सत्यावर आधारित महागाईची कविता . माझ्या कवितेचे शीर्षक आहे- " गॅस महागला, रौकेल महागले "


                   वास्तव-वादी कटू-सत्य कविता
                 " गॅस महागला, रौकेल महागले "
              ----------------------------------   


गॅस महागला, रौकेल महागले
सामान्यांच्या तोंडचे पाणीच-की पळाले
बेकायदा इंधनाचे साठे करुनी,
साठेकरी काळाबाजाराने मालामाल झाले.

     एक वेळ खाण्याची मोताद
     नाही पंच-पक्वांनांचा गरिबांना स्वाद
     यातच महागाईचा भस्मासुर तयांना,
     गिळून करतोय कायमचाच बाद.

जायचे कुठे तयानी आता
हेच एक चुलीचे साधन
खायचे काय त्यांनी आता,
झोपी जायचे करुनी मूक-आक्रंदन.

     ही महागाई वाढतच रहाणार
     गरिबांना आलाय कुठला वाली ?
     आज आहे अर्धपोटी, उदया,
     पहात रहायचे रिकामी थाळी.


-----श्री अतुल एस परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-01.07.2021-गुरुवार.