!! ओम साई भक्ती-काव्य !!- "साई माझा आहे अवधूत अवतार"

Started by Atul Kaviraje, July 01, 2021, 11:22:09 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

मित्र/मैत्रिणींनो,
     
     आज गुरुवार आहे.  श्री साई-बाबांचे आणि एक भक्ती-काव्य. साईंमध्ये मला देवाची अनेक रूपे आढळली. कधी मला त्यांच्यात भोळा-शंकर दिसतो, तर कधी दत्त-दिगंबर. अश्या या अवतारी पुरुषाचे शिर्डी येथील स्थान आता कायमचे झाले आहे. ते आता नाहीत, परंतु, त्यांनी केलेले चमत्कार, सर्व धर्मियांबद्दलची त्यांची कळकळ, आपुलकी, जात पात न पाहणे, सर्वाना एकाच नजरेने पाहणे हे आजही सारे भाविक सश्रद्धपणे कथित करतात . श्रद्धा व सबुरीचा या त्यांच्या एकमेव मंत्राचे आजही भाविक पालन करीत आहेत.

     प्रस्तुत भक्ती-काव्यात मी, श्री दत्त गुरूंची, त्यांच्याच रूपाची एक ओळख करून देत आहे , व दोन्ही रूपांची एकत्र सांगड घालण्याचा प्रयत्न केला आहे. ऐकुया तर श्री साईंवरील एक भक्ती-काव्य. कवितेचे शीर्षक आहे - "साई माझा आहे अवधूत अवतार"


                !! ओम साई भक्ती-काव्य !!

             "साई माझा आहे अवधूत अवतार"
              -----------------------------

तूच भोळा-शंकर, तूच दत्त-दिगंबर
तुझे  शिरडीचे स्थान, हेच औदुंबर
तुझ्यात सामावले अनंत रूपांचे भांडार,
साई माझा आहे अवधूत अवतार.

     दत्त त्रिगुणांचा, पाही सदा-सर्वकाळ
     करीतसे, धेनु श्वानांचा प्रतिपाळ
     तैसे लिंबाखाली बसून साई,
     जमवितो, सर्व-धर्मियांचे बाळ-गोपाळ.

गुरु केले एकवीस, दत्त-गुरूंनी
असुनी साऱ्या जगाचे कैवारी
माणसात माणूस होऊन राहिले बाबा,
दिधला मंत्र, श्रद्धा अन सबुरी.

     मूर्ती सोज्वळ शोभे दत्तांची
     विराजित दिगंबर स्थानी, गाणगापुरी
     तैसे भक्तांसी देती दर्शन साई,
     जो-जो येईल पायांशी, शिरडीपुरी.


-----श्री अतुल एस परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-01.07.2021-गुरुवार.