चष्म्यावर खुशखुशीत विनोदी चारोळ्या-"चष्म्याचा धंदा जोरात चाललाय"

Started by Atul Kaviraje, July 02, 2021, 01:34:44 AM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

           चष्म्यावर खुशखुशीत विनोदी चारोळ्या

             "चष्म्याचा धंदा जोरात चाललाय"
            ------------------------------

(१)
हाती प्रत्येकाच्या मोबाईल शोभतोय
लहान-थोरांना तो सहजच परवडतोय
परि नाही कळत, हळू-हळू होतेय दृष्टी अधू,
बसलोय मी ना येथे,दृष्टी-दोषांचा संधी-साधू.

(२)
मोबाईलने दिलीय मला नवीन दृष्टी
मजवरी करतोय तो पैश्यांची वृष्टी
दुकानी माझ्या झालीय चष्मा घेण्यास गर्दी,
दारावरचे पहारेकरी देतात मला त्याची वर्दी.

(३)
जोरदार चाललाय धंदा चष्म्याचा
दोष वाढतोय प्रत्येकाच्याच दृष्टीचा
जवळचा-लांबचा, वरचा-खालचा, साऱ्यांचा,
चष्मा मी विकतोय, धंदा करतोय फक्त नफ्याचा .

(४)
शहाणे पण करिती वेड लागल्यासारखेच
कळले तरी नाही त्यांच्या वळत
बळी पडलेत सारेच, मोबाईलच्या नकळत,
अश्या ग्राहकांवर असते माझी नेहमीच पाळत.

(५)
अख्खेच्या अख्खे कुटुंब येतंय दुकानात
चाचपडत, धडपडत,नवा चष्मा घेण्यास
मोबाईलकडे ठेवून आलेत ते दृष्टी गहाण,
त्यांच्या दृष्टीत आहे आज मोबाईल महान.


-----श्री अतुल एस परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-02.07.2021-शुक्रवार.