ऐकलेलं

Started by शिवाजी सांगळे, July 02, 2021, 06:00:37 PM

Previous topic - Next topic

शिवाजी सांगळे

ऐकलेलं

जमीन जुमला सारा इथेच राहतो
फक्त नाव आणिक भाव बदलतो

ऐश्वर्य न् सुख सारे क्षणिक येथले
उगीच रे माणसा तू त्यातच गुंततो

जरूरी पुरतेच धनधान्य जमवावे
ऐकलेलं सारं कधी संतांचं मांडतो

नश्वर देह मोह माया पोकळ सारी
मुक्त हाताने शेवटास जो तो जातो

येणे जाणे कधी ना कळले कोणा
सांग 'शिवा' का कोण ठाम वदतो

©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९
©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९

Atul Kaviraje

शिवाजी सर,

     खरोखरच, महाराष्ट्रातील अनेक संतांनी त्याकाळी, आपल्याला आलेल्या अनुभवातून जे काव्य, ज्या ओव्या, ज्या कविता लिहिल्या आहेत, त्या आता आपणास खूपच उपयोगी पडत आहेत. जीवनाचे सारं, ते सांगून गेलेत, त्या काळी. खरोखरच ते महान होते, यात शंकाच नाही.

     आपल्या प्रस्तुत "ऐकलेलं", या जीवनाच्या कवितेतून, आपण हेच पुन्हा एकदा नव्याने सांगण्याचा प्रयत्न केला आहे, जो स्तुत्य आहे. क्षण -भंगुर जीवन, नश्वर देह, पोकळ मोह-माया,आहे भरपूर तरीही रिक्त हस्त, या अनेक विशेषणांतून आपण जीवनाचे खरेखुरे सारं मांडले आहे.

     जन्माला आलास,मुठी वळून आलास
     आयुष्यभर त्यात काही साठवत राहिलास
     पण अंती काहीही नव्हते भरले त्यात,
     जाताना तू रिक्त हस्तानेच गेलास.

     हे माझे, ते माझे, सारेच माझे
     हयात घालवलीस करण्यात सारे तुझे
     पण भोपळा फुटला होता भ्रमाचा,
     फुका माया-मोहात गुंतून राहण्याचा.
   
     काही नाही घेऊन तू जाणार
     सारे सारे काही येथेच रहाणार
     फक्त तुझे सद्-वर्तनाचेच नाव होणार,
     तुझ्या पाठी जग तुझे नाव घेणार.


-----श्री अतुल एस परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-03.07.2021-शनिवार.
     
     

     
     

     

शिवाजी सांगळे

अतुलजी प्रथम आपल्या उत्स्फूर्त प्रतिक्रियेबद्दल आपले मनापासून आभार.
जीवन असेच अनाकलनीय आहे, योग्य विचार आणि जुन्या जाणत्यांच्या अनुभवांचा विचार करून त्या प्रमाणे वागल्यास ते सहज सोपे होउ शकते।
आपण देखील आपल्या काव्यातून बोधक विचार मांडले आहेत. खुप शुभेच्छा.
©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९