कृष्ण-कृत्य वास्तव कविता-" अपहरणाची किमया, खंडणीची दुनिया "

Started by Atul Kaviraje, July 02, 2021, 11:31:06 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

मित्र/मैत्रिणींनो,

     आणखीन एक कृष्ण-कृत्य विषयावरील गंभीर कविता. उठता बसता कुणीही कुणाचेही अपहरण करायचे व ओलीस ठेवून खंडणी खायची. कोणा एके काळी या गोष्टीचे भरपूर पीक आले होते. एखादी धनिक व्यक्ती हेरायची, व त्यांच्या घराच्या लहान मुलांचे अपहरण  करून, त्यांचेकडे भरपूर अशी रक्कम खंडणीच्या स्वरूपात मागून, आयुष्यभर ऐतखाऊ व्हायचे . नोकरी न करता, या सोप्या गोष्टीनी आरामात घर-बसल्या पैसे येताहेत, तर मग नोकरी कोण करेल हो ?

     हा बहुतेक गुन्हेगारांचा एक धंदाच होऊन बसला होता. प्राण-भयाच्या भीतीने, पोलिसांतही तक्रार नोंदविण्याचे बहुतेक जण टाळत होते. अश्या रीतीने, नकळत  त्या गुन्हेगाराची एका अर्थी मदत करून, आपणही गुन्हा करतोय, एक गुन्हेगार होतोय, याची त्यांना जाणीवच नसायची. असो, आता या अपहरणाच्या बातम्या वाचनात फारश्या येत नाहीत. तरीही, या गोष्टी पुढे घडू नयेत, समाज-विघातक कारवायांवर व गुन्हेगारांवर  त्वरित कारवाई व्हावी, यासाठी सरकारने काही कठोर पाऊले उचलावयास हवीत.

     प्रस्तुत कविता, अश्याच एका सामाजिक गुन्हेगारी विषयावर, थोडीशी विनोदाची झलक असलेली, मार्मिक अशी आहे. कवितेचे शीर्षक आहे - " अपहरणाची किमया, खंडणीची दुनिया "


                     कृष्ण-कृत्य वास्तव कविता

            " अपहरणाची किमया, खंडणीची दुनिया "
            ------------------------------------

बेकार राजा , त्याची बेकार प्रजा
चुकार गुन्ह्यांची मिळते टुकार सजा
अपहरण करा, बिनधास्त कोणाचेही,
अन खा मस्त खंडणीची मलई.

     राजरोस गुन्हे घडताहेत इथे
     बेकारीच सर्वाला कारणीभूत होते
     मालामाल शेठ हेरला जातो,
     त्याचा कोवळा देठ खुडला जातो.

विकसित झालंय सोपे तंत्र
अपहरण आणि खंडणी एकचं तंत्र
घाई नाही, गडबड नाही,
पाठी पोलीस नाही, कोठडीची हवा नाही.

     अलगद हाती येतो पैसा
     पाण्यावर येतो तरंग जैसा
     दुकान थाटलंय बहुतेकांनी अपहरणाचे,
     आरामात खाताहेत फळ खंडणीचे.

अपहरणाची किमया, खंडणीची दुनिया
काम करतोय, इथे रुपया
अखिल मानव-जात चाललीय अधोगतीस,
सारे-काही मिळणार आहे शेवटी मातीस.


-----श्री अतुल एस परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-02.07.2021-शुक्रवार.