नोकरी-वास्तव-व्यंग्य कविता - "काढा व्हिसा, अन परदेशी घुसा !"

Started by Atul Kaviraje, July 03, 2021, 11:17:22 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

मित्र/मैत्रिणींनो,

    आज काल परदेशी जाऊन श्रीमंत व्हायचे लोण सर्वत्र पसरलेय , व्हिसा काढून थोड्या काळासाठी परदेशी जाऊन नोकरी करायची आणी झट - पट श्रीमंत होऊन पुनः मायदेशी परतायचे, एक करतो म्हणून दुसरा करतो, आणी मग तिसराही करतो, आणी हि लागण लागत जाते .

     परंतु या अंध जमावाला हे दिसत नाही कि येथे भारतात राहूनही तुम्ही काम करू शकता, येथेही तुम्हाला पैसा कमावता येईल, मान मिळेल, सुबत्ता मिळेल, नाव होईल. परंतु नाही, मला परदेशी जायचे हि भ्रामक कल्पना येथे एवढी सखोल रुजली आहे, कि अश्या व्यक्तींचे मन कुणीच वळवू शकत नाही. आणी शेवटी व्हायचे ते होतेच. कित्येक लोंकाची  परदेशी जाऊन फसवणूक झाल्याचे माझ्या वाचनात आले आहे, मान मिळत नाही तो नाहीच, गुरांसारखे त्यांना राबवले जाते, आणी शेवटी पळ काढण्याची पाळी त्यांचेवर येते.

     माझी अश्या लोकांना कळकळीची विनंती, आहे की मित्रानो, तुम्हाला मायदेशीही  भरपूर नोकऱ्या आहेत, सोयी आहेत. ज्या तुमचे समाजातील स्थान वाढवतील, तुम्हाला यशो-शिखरावर नेऊन सोडतील. तेव्हा हा हट्ट सोडा, आणी आपल्या मायभूमीशी इमान राखा. जेथे आपला जन्म झाला, जेथे आपण लहानाचे मोठे झालो,अश्या या पवित्र भारताचे  तुम्ही ऋणी रहा, आणी आपला जन्म सत्कारणी लावा.

     मित्रानो, एक कविता सुचली आहे, या परदेश गमनावर, एक व्यंगात्मक झाक असलेली. कवितेचे शीर्षक आहे - "काढा व्हिसा, अन परदेशी घुसा !"

                         नोकरी-वास्तव-व्यंग्य कविता

==================
"काढा व्हिसा, अन परदेशी घुसा !"
==================

परदेशाचे लागलेत आजकाल डोहाळे
व्हिसा-काढण्यास रांगेत उभे सगळे
इथे पोट नाही भरत म्हणून की-काय ?
परदेशी चाललेत मूर्ख बावळे !

मान-नाही, परदेशी स्थान नाही
प्राण-जाई, पण केलेल्याची जाण नाही
गड्यासारखे राब - राब राबावे लागते,
उठ-बस मालकाचे ऐकावे लागते.

अधिक दोन चार रुपड्यांसाठी
आज तो मायभूमीला मुकलाय
झटपट श्रीमंतीची स्वप्ने पाहताना,
बरंच काही भरून चुकलाय.

अंती स्वातंत्र्य मायभूमीतच लाभेल
गोऱ्यांची  का गुलामगिरी हवी ?
पैसाच नाही आज सर्वस्व,
आपल्याच स्थानी आपलेच वर्चस्व !

     तर, मित्रानो, विचार करा, आणी आपल्या मायभूमीशी प्रामाणिक रहा.


-----श्री अतुल एस परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-03.07.2021-शनिवार.