‘किती वाजले?’

Started by Swan, March 16, 2010, 01:45:28 PM

Previous topic - Next topic

Swan

एक तरुण मुलगा व एक प्रौढ मनुष्य रेल्वे प्रवासात समोरासमोर बसले होते. प्रौढ माणसाच्या हातात घडय़ाळ होते. तरुणाने त्यांना विचारले, 'किती वाजले?'
प्रौढ माणूस म्हणाला, 'तू मला टाईम विचारला. मी तुला टाईम सांगितला की, तू आणखी बोलत बसशील. माझ्या जवळचे पुस्तक, पेपर घेऊन वाचशील. पुढच्या स्टेशनवर कदाचित चहा पाजशील, नाश्ता करवशील. अशाने आपली ओळख वाढेल. मग तू मला एखादे दिवशी जेवायला घरी बोलावशील. मग नाईलाजाने मलासुद्धा तुला जेवायला घरी बोलवावे लागेल. त्या निमित्ताने तू माझ्या सुंदर मुलीला पाहशील, तुमची ओळख होईल कदाचित तुम्ही प्रेमातसुद्धा पडाल. मग हळूच एकेदिवशी तू माझ्या मुलीचा हात मागशील, आणि आणि.. मी माझ्या मुलीचा हात अशा कफल्लक तरुणाच्या हाती बिलकूल देणार नाही. ज्याच्या हातात साधे घडय़ाळ नाही..'

santoshi.world

लोकसत्ता वाचतोस वाटतं ........ सगळे रविवारच्या चतुरंग मधले pj आहेत  ;)

Swan

लिटरेचर  रीव्हू  छान आहे तुमचा .."सकाळी" मी लोकसत्ताच वाचतो.. 8)