उपोषण-सामाजिक कविता-"केव्हा संपणार तुमचे उपोषण, थांबवा तुमच्या शरीराचे शोषण"

Started by Atul Kaviraje, July 04, 2021, 10:50:29 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

मित्र/मैत्रिणींनो,

     आपला हक्क नाही मिळाला, आपल्या मागण्या मान्य नाही झाल्या कि संपाचे, आंदोलनाचे हत्यार उपसायचे, कि ज्यामुळे आपल्याला न्याय मिळेल ,हक्क मिळेल, मागण्या मंजूर होतील. नेत्यांपासून ते जनतेपर्यंत अगदी सामान्य माणूसही या हत्याराचा बळी पडत चाललाय. सरकार बळेच नमतय , या आंदोलनाला, हा अनुभव गाठीशी असतो. पण सरकारच्या मनात आणि पोटात जायचा एक अत्यंत सोपा आंदोलनाचा अति प्राचीन उपाय म्हणजे उपोषण-आंदोलन.

     आणि मित्रानो या उपोषणाची प्रथम आणि खरीखरी सुरवात स्वातंत्र्य सेनानी मान्यवर श्री अण्णा हजारे यांनी केली होती, त्याची रुजुवात त्यांनीच तर घातली होती. अगदी तरुण काळात भारत मातेस आजाद करण्यापासून ते अगदी आतापर्यंत त्यांनी जो लढा लढविलाय त्यास तोड नाही. आत्ता वयाची जवळ जवळ पंच्याहत्तरी ओलांडूनही, जनतेचे प्रश्न ते एखाद्या तरुण योध्याप्रमाणेच सोडवीत आहेत. अक्षरशः त्यांनी सामान्य माणसाच्या सेवेस वाहून घेतले आहे. उपोषण हाच खरा न्याय मिळवून देणारा अंतिम मार्ग आहे, हे लक्ष्य ठेवून त्यांनी आतापर्यंत शेकडो उपोषण आंदोलन केली आहेत. साधी राहणी असूनही ते जनतेच्या मनात उतरले होते, स्थान मिळवले होते.

     प्रस्तुत, कविता ही मी या खऱ्या अहिंसेच्या उपोषण आंदोलन कर्त्यास, मानाचा मुजरा म्हणून लिहिली आहे. या वयातही, ते अतिशय ऍक्टिव्ह आहेत, व जनतेच्या कार्यास अजूनही वाहून घेत आहेत, माझ्या मते त्यांनी आता या उपोषणातून रिटायरमेंट घ्यावे, आणि दुसऱ्या  कुणा या क्षेत्रात येणाऱ्या कार्यकर्त्यास नवा चान्स द्यावा. ऐकुया तर, ही अण्णा हजारेंच्या जीवन पटावरील सामाजिक प्रेरणादायी कविता. कवितेचे शीर्षक आहे- "केव्हा संपणार तुमचे उपोषण, थांबवा तुमच्या शरीराचे शोषण"

     
     
                     उपोषण-सामाजिक कविता
   "केव्हा संपणार तुमचे उपोषण, थांबवा तुमच्या शरीराचे शोषण"
   ---------------------------------------------------------


वहात होते तेव्हा मना-मनांत
भारत-मातेच्या स्वातंत्र्याचे जोरदार वारे
एक क्रान्तिकारी सळसळत्या रक्ताचा,
आंदोलनात शामिल होता विसरून सारे.

भर तारुण्यात पाहत होता स्वप्न
बेडी भारत-मातेच्या हातातील तोडण्याची
इतर क्रान्तिकारकांसह उपसून बंडाचे हत्यार,
तिचा, पारतंत्र्याचा उंबरठा ओलांडण्याची.

अंती स्वातंत्र्य मिळाले,प्रयत्नांनी हजारोंच्या
मुक्त झाली भारत-माता प्रयासाने लाखोंच्या
बलिदान, त्याग केलेले होते यात हजारो,
परि एकच एक होता,यासम हाच,अण्णा हजारे.

तेव्हापासून वेड लागले त्यांना त्यागाचे
अन सामान्य माणसाचे अधिकार जपण्याचे
स्वतःकडले न राखता हातचे काहीही,
देऊन सर्व, सर्वाना ते मोकळे झालेही.

नंतर कधीही पाठी वळून न पहाता
अनोख्या संग्रामात परतुनी घेतली उडी
उपोषणाचे हत्यार उपसून त्यांनी सदैव,
हाती धरली होती सरकारची नाडी.

आयुष्य  घालवले असेच वहात, काल-प्रवाहात
हयात वाहिली सेवेस, कायम लोक-कल्याणात
उपोषणाशिवाय त्यांना पर्यायच नव्हता सुचत,
हाच एक मार्ग खरा बंडाळीचा,असे ते म्हणत.

अशी कित्येक उपोषण आंदोलने गाजवली 
अण्णांची पूज्य छबी जनतेच्या मनांत सामावली
लोकप्रिय, लाडका नेता म्हणून विख्यात झाले,
तरी इतके होऊनही आयुष्यभर साधेच राहिले.

गांधी टोपी, सफेद कुर्ता-पायजमा
पायी चप्पल, साधी त्यांची रहाणी
परि भल्या-भल्याना देत होती टक्कर,
त्यांच्या भाषणातील रोख-ठोक, मार्दव वाणी.

सरकार बळेच नमतं होते, त्यांच्या आंदोलनाला
मान,सन्मान देत होते,त्यांच्या सरळ व्यक्तिमत्त्वाला
स्वाभिमानी, बाणेदार,स्पष्ट-वक्त्या स्वभावाने,
जपले होते लोकांस, केले त्यांना आपलेसे जनतेने.

आता या वयातही घेताहेत उभारी
ओलांडलीय त्यांनी वयाची पंच्याहत्तरी
तरी तीच उमेद,तोच ताठा, तोच बाणा,
दिसतोय आम्हा त्यांचा ताठ सरळ कणा. 

थांबवा तुम्ही अण्णा आता, उपोषण !
कितवर स्वतःच्याच शरीराचे करणार शोषण ?
अन्याय घडत होता आधीही, यापुढेही घडणार,
कोणा-कोणास व किती तुम्ही पुरेसे पडणार ?

आता तुम्ही रिटायरमेंट घ्या !
दुसऱ्यांस उपोषणाची एक संधी द्या
त्यांनाही कळूदे, मग तुमचे महत्त्व,
अन जनतेच्या न्यायास,सदैव झगडणारे तत्त्व.


-----श्री अतुल एस परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-04.07.2021-रविवार.