बेघर गरीब - (वास्तव चारोळ्या)-" रस्त्याच्या कडेस राहणारे बेघर "

Started by Atul Kaviraje, July 05, 2021, 01:53:17 AM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

              बेघर  गरीब - (वास्तव चारोळ्या)
              " रस्त्याच्या कडेस राहणारे बेघर "
            --------------------------------


१)  व्याप्ती वाढलीय वस्त्यांची येथे
     जो येतो घर करू पाहतो
     गरिबांचा वाली नसतो कुणीही,
     जवळ करावा लागतो त्यांना रस्ताही.

२)  घर नाही त्यांना राहायला
     छप्पर नाही त्यांच्या झोपडीला
     कडेस वास्तव्य त्यांचे दाटी-वाटीने,
     रस्त्याचे तिन्ही-त्रिकाळ असते गजबजणे.

३)  गावाकडून येतात भरण्यास पोट
     राहण्याचा नाही त्यांचा ठाव-ठिकाणा
     हातावर असते रोजचे पोट,
     भिंती -कनाती उभ्या रस्ता कडांना.

४)  नाही सोयी, सुविधांचा दुष्काळ
     मजुरी करतोय सकाळ,संध्याकाळ
     थकून भागून घरी यावे,
     उशास कडेचे दगड घ्यावे.

५)  दुर्लक्ष होतंय त्यांचेकडे सरकारचे
     प्रश्न वाढत चाललेत बेघरांचे
     नवीन घराची आस करता,
     वर्षे सरकतात पहाता-पहाता.


-----श्री अतुल एस परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-05.07.2021-सोमवार.