राजकारण वास्तव कविता - "हुकमी पत्ते प्रमुखांकडे , फक्त जोकरच उरलेत नेत्यांकडे !"

Started by Atul Kaviraje, July 05, 2021, 11:48:52 AM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

मित्र/मैत्रिणींनो,

     ज्येष्ठ राजकीय समीक्षक,विश्लेषक श्री भाऊ तोरसेकर, यांच्या "प्रतिपक्ष" या यु - ट्यूब चॅनेलवरून त्यांनी मांडलेला राजकारणातील  "हुकुमाचे पत्ते मोदींच्या हातात, मग पत्ते तुम्ही पिसता कशाला ?", या विषयावर  मी रचलेली ही प्रस्तुत कविता आहे. इतर राजकीय नेते, दररोज राजकारणाचे जे पत्ते पीसत असतात, आणि जी खेळी खेळतात , जो डाव मांडतात, आणि सांगतात कि हुकमी पत्ता माझ्याकडे आहे, आणि मीच हा डाव जिंकणार. पण वास्तवात त्यांच्या भ्रमाचा भोपळा तेव्हा फुटतो, जेव्हा त्यांना असे आढळून येते, कि वरचढ हुकमी पत्ते, म्हणजे राजा, राणी, गुलाम व एक्का हे तर देशाच्या पी एम कडे म्हणजेच पंतप्रधानांकडे आहेत, आणि आपल्याकडे असलेल्या जोकरलाच आपण हुकमी पत्ता समजून डाव खेळत आहोत.

     आणि त्यांना वास्तविकता जेव्हा समजून येते, तेव्हा त्यांना कळून चुकते, कि या खेळाचा सर्वेसर्वा तर देशाचा प्रमुख आहे, आणि आपला पत्त्यांचा डाव पूर्णपणे फसलेला आहे, आणि आपण या खेळात हरलेलो आहोत. आपल्या हाती असलेले पत्ते जे आपण  हुकमी समजत होतो, ते तर फक्त जोकरच निघाले. आपल्याला तर काहीच अधिकार नाहीत. ते तर फक्त देशाच्या प्रमुखांच्याच हाती आहेत.

    मित्रानो, ऐकुया तर उपरोक्त विषयावरील राज-कारणावरील वास्तव - गंभीर कविता. कवितेचे शीर्षक आहे - "हुकमी पत्ते प्रमुखांकडे , फक्त जोकरच उरलेत नेत्यांकडे !"


                        राजकारण वास्तव कविता
      "हुकमी पत्ते प्रमुखांकडे , फक्त जोकरच उरलेत नेत्यांकडे !"
      ----------------------------------------------------


पत्ते पिसलेत, वाटले गेलेत
डाव मांडलाय,डाव रंगलाय
हुकमी पत्ते घेऊन खेळताहेत,
सारे हुकुमाची खेळी खेळताहेत.

जो तो आहे खुश खेळात
बाजी जिकंतोय अल्पश्या वेळात
वाटतंय मीच वरचढ, सर्वश्रेष्ठ,
या खेळातला मीच ज्येष्ठ.

हुकुमी पान माझेच आहे
हा डाव नक्कीच माझा आहे
जोकर काय करायचाय मला ?
त्याच्याशिवाय पहा मी डाव जिंकला !

बातमीदार करिती बातमी फ्रंट-पेजवर
अमुक नेत्यांनी तमुक केले
बातमी रंगवून अशी छापतात,
पहाता-पहाता वर्तमानपत्रे हातोहात खपतात.

नेत्यांना वाटते आपल्यामुळेच झाले
हुकुमी पत्त्यांनी माझ्या काम केले
एकमेकांना डावात हरवू पाहतात,
आपले वर्चस्व प्रस्थापू पहातात.

पण त्यांना अजूनही नाही समजत
डाव पत्त्यातला खरा नाही उमजत
आजवर हाती जे होते पत्ते हुकुमी,
ते फक्त होते जोकर-गुलामी.

भ्रमाचा भोपळा फुटतो त्यांच्या
जेव्हा हाती उरतो जोकरच त्यांच्या
खरा हुकूमशहा वेगळाच असतो,
हुकुमी पत्ता त्याच्याच हाती असतो.

वरूनच खरे पत्ते पिसले जातात
हुकुमाचे पान हाती राखूनच
बाकी होते वाटप फक्त जोकरचेच,
डोळे उघडतात तेव्हा नेत्यांचेच.

प्रमुख राजकारणी तोच असतो
देशाचा सर्वेसर्वा तोच असतो
तोच खरा राजकारणी असतो,
ज्याच्या हाती सत्ता आणि हुकूम असतो.

जो अधिकार नेते गाजवू पहातात
तो निव्वळ आभास असतो
आपण करतोय तीच का पूर्व-दिशा ?
कि नुसताच भास असतो ?

सर्व अधिकार प्रमुखांच्याच हाती
राज-कारणाचे सारे हक्क त्यांनाच प्राप्त
हुकुमी पत्ते तेच बाळगतात,
इतर नेते फक्त गुलामच असतात.

पत्ते खेळताना यापुढे असावे लक्षात
हुकुमाचे पान जरी असले हातात
त्या पानास जोकरच समजावे,
आणि निमूट या खेळात रंगावे.


-----श्री अतुल एस परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-05.07.2021-सोमवार.