नवल कविता-"फ्री पिझ्झा बाळाला मिळणार, आयुष्यभर खाऊन सुखात राहणार ?"

Started by Atul Kaviraje, July 08, 2021, 11:22:10 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

मित्र/मैत्रिणींनो,

     आणखीन एक नवल कविता, बऱ्याच दिवसांपूर्वी एक बातमी  ऐकण्यात आली होती की,एका पिझ्झा बनवणाऱ्या कंपनीने जाहिरात केली होती. एका विशिष्ट दिवशी, म्हणजे सुमुहूर्तावर जन्माला आलेल्या बाळाला त्या कंपनीकडून आयुष्यभर पिझ्झा फ्री म्हणजे फुकट मिळेल . आहे की नाही नवलाईची बातमी. अहो, या जगातच इतके नवल, इतकी आश्चर्ये भरलेली आहेत, की हे नवल त्यापुढे काहीही नाही. तर ही कंपनी त्या भाग्यवान बाळास आयुष्यभरासाठी त्यांचा स्पेशल पिझ्झा फुकट देण्यास नियमांप्रमाणे कटिबद्ध होती. अर्थात या योजनेपाठी,त्यांचा अजिबात काही उद्देश नव्हता, हे फक्त म्हणण्यापुरते  ठीक आहे,बहुतेक त्यांची ही एक जाहिरातीची  पद्धत असावी देखील,  पण कोणतीही कंपनी काही हेतू मनात योजूनच या अभिनव योजना राबवित असाव्यात, असे मला वाटते.

     असो, मूळ मुद्दा, असा की ते  त्या दिवशी जन्मलेले बाळ अतिशय भाग्यवानच म्हणायला हवे. आता मला सांगा की, ही बातमी तुम्हा खरी वाटते की खोटी ? पण प्रत्यक्षात ती बातमी यु-ट्यूब वर दाखविण्यात आली होती. आता विचार करा, आयुष्यभर कुणी पिझ्झा खाऊ शकेल का ? त्याला काय खूळ लागलेय ? असो, तर उपरोक्त विषयावर एक कविता सुचली आहे. ऐकुया, तर ही पिझ्झाचा खमंग स्वाद असलेली, व्यंगाची झालर आणि विनोदाची झाक असलेली, बाळ-बोध सोप्या शब्दांतील नवल-कविता. कवितेचे शीर्षक आहे - "फ्री पिझ्झा बाळाला मिळणार, आयुष्यभर खाऊन सुखात राहणार ?"

                   विषय-बाळाला मिळणार आयुष्यभर फ्री पिझ्झा
                -------------------------------------------

                                          नवल कविता
          "फ्री पिझ्झा बाळाला मिळणार, आयुष्यभर खाऊन सुखात राहणार ?"
         ---------------------------------------------------------------

धन्य ते आई-बाबा बाळाचे
नशीब घेऊन आलयं बाळ स्वतःचे
कौतुक करिती, नातलग सारे जन,
आश्चर्य व्यक्त करिती सारे मनोमन.

जाहीर झालाय बाळाला पिझ्झा फ्री
नाही द्यावयास लागणार हयातभर फी
आयुष्य त्याचे भरभराटीस आलयं,
त्याच्या खाण्याचे चोचले पुरवलेय.

झालाय जन्म बाळाचा एका विशिष्ट दिनी
लागलीय जणू त्याला लौटरीच मिनी
अमुक दिवशी बाळ जन्मा आले,ही घोषणा,
आयुष्यभर मिळेल फ्री पिझ्झा त्यास खाण्या.

पिझ्झावाल्यांची लागलीय घराकडे रीघ
त्यांचंही आतास वाढीस आलंय जाहिरातींचं पीक
कंपन्या नावारूपाला आल्यात पहाता-पहाता,
त्यापाठी हे बालक होते कृपा-करता. 

बाळ खेळत होते, बाळ हसत होते
जणू काही त्यास सारे समजत होते
बोळक्या दातांनी ते पिझ्झाच्या तुकडयांचे,
रवंथ करण्यात पहा कसे मशगुल होते.

आई-वडिलांची मिटली होती सारी चिंता
बेबी-फूडची आता नव्हती आवश्यकता
साराच खर्च वाचला होता बाळाच्या खाण्याचा,
सुदिन उगवला होता पहा,आई-वडिलांच्या भाग्याचा.

नामांकित कंपन्यांत सुरु होती स्पर्धा
पिझ्झा आमचा खावा बाळाने नुसता तरी अर्धा
या अहमहमिकेत त्यांनी सुरु केलाय नवा धंदा,
इतरांच्या मागण्या रद्दच  झाल्या होत्या यंदा.

तिन्ही-त्रिकाळ बाळास पिझ्झा मिळू लागले
टाळ्या लागले पिटू,हुंदडू,ते सैरावैरा धावू लागले
कौतुक करिती बाळाचे कित्येकदा शेजारी,
का नाही आले जन्मा ते अमुच्या घरी ?

नशिबास दोष ते निघून जात होते
एक आणि योजना येईल, मनास समजावीत होते
काही इच्छुक लग्नाळू हॉल पाहू लागले,
बाळ-जन्माची पुढील वर्षाची वाट पाहू लागले.

ही शक्कल कोणाच्या मेंदूतून निघाली
याचे शेजारी आश्चर्य व्यक्त करीत होते
बाळाचे नशीब फळफळलेले पाहून,असूयेने,
ते सारे,आत-बाहेर नुसते जळत होते.

पिझ्झा कंपन्या नवं-नवीन योजना राबविताहेत
अचानक येऊन प्रसिद्धीस, ते खोऱ्याने पैसे ओढताहेत
जाहिरात जगात, पिझ्झा कंपन्या झाल्यात अग्रेसर,
हौटेलांनाही देऊन मात, वाढलाय त्यांचा स्तर.

आई-वडील होते म्हणत मनाशी स्वतःच्या
बाळाने नशीब काढून,आमचेही नाव केले
आणि आयुष्यभर पिझ्झा खावयास घालून,
त्यांनी बाळास वाढविले, मोठे केले.


    तर, मित्रानो, आपणही वाट पहात आहात ना आपल्या बाळाच्या जन्माची !


-----श्री अतुल एस परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-08.07.2021-गुरुवार.