विज्ञान-नवल कविता-" वरुण-राजा तुझे दिवस गेले आता !"

Started by Atul Kaviraje, July 09, 2021, 12:20:23 AM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

मित्र/मैत्रिणींनो,

     थोडीशी हटके अशी प्रस्तुत कविता आहे. या जगात, विज्ञानाच्या जोरावर मानवाने बरीच प्रगती केली आहे. आता तर तो अंतराळाला गवसणी घालून, मंगळावरही जाण्याचे स्वप्न पाहत आहे. थोडक्यात, मनात आणले तर तो काहीही करू शकतो, त्याला काहीही म्हणजे काहीही अशक्य नाही.

     ही कविता, त्या वरुण-देवाला, पावसाला म्हणजे निसर्गाला आव्हान देणारी अशीच आहे. वर नमूद केल्याप्रमाणे, हा प्रगती-शील मानव न जाणो भविष्यात पावसाळा ऋतूची वाट न पाहता, शास्त्र - मदतीने, पाऊस ही पाडू शकेल, हे अतर्क्या-बाहेरील वाटते. पण अशक्य नाही. कारण आधुनिक शास्त्र त्याच्या मदतीस आहे.

    त्या वरुण-राजाची, व पाऊस-देवाची, मनोमन माफी मागून, मी ही कविता आपणापुढे प्रस्तुत करीत आहे, ही वेगळी - आगळी कविता आपणास आवडेल, अशी मनीषा ठेवतो. ऐकुया तर माझी विज्ञाना-वरील कविता. कवितेचे शीर्षक आहे-" वरुण-राजा तुझे  दिवस गेले आता !"

                        विज्ञान-नवल कविता
              " वरुण-राजा तुझे दिवस गेले आता !"
             ----------------------------------


निसर्गासही आव्हान देत आहे
निसर्गापेक्षाही बलवान होत आहे
निसर्ग-नियमात बदल करू पहात आहे,
या माणसाचे डोकेच फिरले आहे.

     वरुण-राजा, तुझे गाठोडे बांध स्वतः
     तुझे दिवस गेले रे आता
     किमया सापडलीय माणसास पाऊस पाडण्याची,
     वाट नाही पहाणार तो, आता तुझ्या ढगांची.

हिरवीगार शेते आता उन्हाळ्यातही दिसतील
हिवाळ्यातही वृक्षांस मोहोर येईल
ठिकठिकाणी जोरदार वृष्टी होईल,
एक नवीन सृष्टी निर्माण होईल.

     शास्त्राच्या जोरावर, अगाध शक्तीवर
     मनुष्याने अफाट केलीय प्रगती
     सृष्टीच्या नियमांत करून बदल,
     तो केव्हाही करू लागलाय वृष्टी.

होऊ पहातोय तो हळूहळू निर्माता
कृत्रिम सूर्य निर्मिला, तरी नवल नाही
अशक्य आता त्याला काहीही नाही,
अवकाशाला गवसणी घालण्याचे स्वप्न पाही.


-----श्री अतुल एस परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-09.07.2021-शुक्रवार.