भेसळ-युक्त वास्तव-वादी कविता-" रंगीत शीत पाणी कि कीटक-नाशकांची पेरणी ?"

Started by Atul Kaviraje, July 11, 2021, 02:10:28 AM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

मित्र/मैत्रिणींनो,

     पुन्हा एक भेसळीची वास्तव वादी कविता. उन्हाळ्यात शरीराचा उष्मा आणि घामामुळॆ येणार थकवा घालण्यास माणूस क्षणभर, शीत पेय विक्री केंद्रात थांबतो, आणि जे मिळेल ते शीत पेय, घशात ओतून थंड होतो. अनेक शीत पेये कंपन्या, यामुळे त्यांच्या अधिक खपामुळे नावारूपास आल्या आहेत. त्यात पेप्सी, मँगोला, लेहार, कोका-कोला, मिरिंडा आदी कंपनीचा नंबर लागतो. या कोल्ड्रिंक बनवणाऱ्या कंपन्या उन्ह्याळातच आपल्या शीत पेयांचा खप जास्त प्रमाणात करतात. इतर सिझन मध्ये ही त्या थोड्या फार प्रमाणात  विक्री करून, आपला बिझिनेस करीत असतात. थोडक्यात त्यांची हि विक्री वर्षभर सुरु असते.

     काही वर्षांपूर्वीची ही खरीखुरी कहाणी आहे. बऱ्याच तृषार्त व्यक्तींना त्या वेळी ही शीत पेये पिता-पिता त्याचा स्वाद वेगळाच जाणवू लागला होता. ही नेहमीची चव नाही, हे त्यांनी ताबडतोब ओळखले होते. कारण ते नेहमीचेच शीत पेयांचे कस्टमर होते. प्रयोग-शाळेत तपासणी करता अंती त्यांना त्या शीत पेये बाटल्यांत चक्क कीटक नाशक केमिकल चा अंतर्भाव असल्याचे आढळून आले. पण का ?, कोण करील ही जीवघेणी थट्टा ? कोण कोणाच्या जीवावर उठेल हे भयानक, जीवघेणे कृत्य करून ? पण हे खरं आहे, हे तेव्हा घडले होते.

     अर्थात हे काम त्या भेसळ करणाऱ्या खोट्या भेसळ-युक्त कंपनीचे होते हे सांगायलाच नको. शीत पेय बाटल्यात खोट्या पेयांत भेसळ करायची, आणि वर खोटे लेबल मारून, खऱ्या कंपनीचे नाव बदनाम करायचे, असा दुहेरी गुन्हा ते करायचे. त्यामुळे मित्रानो, एक प्रेमळ सल्ला, कि शीत पेयांच्या भानगडीत ना पडता, सदैव आपल्या जवळ स्वतःची  हक्काची पाण्याची बाटली बाळगा, किंवा घरी गेल्यावर तहान भागविण्यास माठातले किंवा फ्रिज मधील थंड पाणी प्या. ऐकुया तर या भेसळ विषयावरील एक वास्तव-वादी, पिणाऱ्यांच्या जीवावर उठणारी, ज्वलंत विषयावरील कविता. कवितेचे शीर्षक आहे-
" रंगीत शीत पाणी कि कीटक-नाशकांची पेरणी ?"


                  भेसळ-युक्त वास्तव-वादी कविता
          " रंगीत शीत पाणी कि कीटक-नाशकांची पेरणी ?"
         ---------------------------------------------


उन्हाळा आला, तहान शमवा
तहान शमवाया, शीत-पेये प्या
कोल्ड्रिंकच्या कंपन्या चालल्यात जोरात,
बाटल्या संपताहेत रंगीत हातोहात.

     पेप्सी-कोला,अहाहा स्वाद काय बोला !
     मिरिंडा, मँगोला, चला लवकर पिऊ चला
     लिम्का, लेहार पेये आहेत जोरदार,
     अश्या बऱ्याच पेयांची विक्री चालू लगातार.

नकळे या अंध तृषार्त जनांना
तहानलेल्या घशांना ओलावा देणाऱ्यांना
पितोय ते नाहीय गोड-रंगीत थंड-पाणी,
तर त्यात आहे चक्क कीटक-नाशकांची पेरणी.

     कसे होते-कधी होते, ठाऊक नाही कुणा
     उमजते तेव्हा, कुणी आजारी पडतो पाहुणा
     जीवावरच उठलेत माणसाच्या, भरताहेत खिसे,
     कोल्ड्रिंक बनवणाऱ्याना अन पिणाऱ्याना लागलंय पिसे.

आमची शीत-पेये प्या, अन आजारी पडा
कुणीही करीत नाही जाहिरात
प्रकृतीची काळजी घेणे आपल्याच हाती,
असावी उकळलेल्या पाण्याची बाटली सदैव हाती.


-----श्री अतुल एस परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-11.07.2021-रविवार.