खमंग-राजकारणी विनोदी कविता-"काल जिलेबी-फाफडा, उद्या रास-गरबा उड्या"

Started by Atul Kaviraje, July 12, 2021, 11:33:20 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

मित्र/मैत्रिणींनो,

     या नेत्यांच्या मनात काय काय राज-कारण शिजतंय, हे कुणीच जणू शकत नाही. आपल्या पार्टीचे नाव येण्यासाठी, आपले नाव होण्यासाठी, आपल्याला नागरिकांकडून भरघोस मते मिळण्यासाठी ते अनोख्या शकली लढवत असतात. माझी प्रस्तुत कविता ही या विषयावरच आहे. ऐकण्यात आले होते, कि चर्चा सत्रे करण्यास, मिटींग्स घेण्यात  आल्या होत्या, कुठे तर चक्क गुजराती बांधवांच्या समाजात.आणि निमित्त तर जिलेबी-फाफड्याचे, जो कि या गुजराती समाजाचा एक पारंपरिक आवडीचा स्वादिष्ट पदार्थ.

     या निमित्ते या पदार्थांचा स्वादही घेता येईल आणि आपला मूळ उद्द्येशही सफल होईल, यापाठी, अनोखे राजकारण असू शकेल, असे बरेचसे जाणकार म्हणत आहेत. गुजराती बांधवांच्या मनात स्थान निर्माण होईल आणि त्यांची भरघोस मतेही मिळू शकतील, हाच मूळ उद्देश्य या जिलेबी-फाफडा आयोजनापाठी असावा असे मलाही आता वाटू लागलंय.

         असो, माझ्या कवितेसाठी मात्र मला एक खमंग विषय मिळाला हे नक्कीच. काही काही जण तर म्हणताहेत, उद्या या गुजराती बांधवांच्या समाजात, रास-गरब्याचेही आयोजन झाले तर त्यात नवल ते काय ? ऐकुया, या जिलेबी-फाफड्याची खमंग, गोड, चुरचुरीत, स्वादिष्ट,थोडीशी विनोदाची झाक असलेली राज-कारणी कविता. कवितेचे शीर्षक आहे-"काल जिलेबी-फाफडा, उद्या रास-गरबा उड्या"


                  खमंग-राजकारणी विनोदी कविता 
           "काल जिलेबी-फाफडा, उद्या रास-गरबा उड्या"
          -------------------------------------------


राज-कारण उठसुठ कुणीही करावे
राज-कारण उठून आणि बसूनही करावे
राज-कारण फिरून, चालून, खाऊनही करावे,
राज-कारण धावून, पळून, नाचूनहि करावे.

नेत्यांना हवीत फक्त चर्चा -सत्रे
कामाचे काय ? तर नुसतेच नाम-मात्रे
चर्चेस जागा त्यांना भरपूर उपलब्ध,
हाय रे कर्मा, जनतेचे हेच का प्रारब्ध ?

खूप होतात मग, यासाठी अड्वर्टाइजमेण्ट
ठिकाणे निवडली जातात फारच डिसेंट
नाही घेतले जात, सरकारकडून त्याचे रेंट,
कारण मिळत असतो त्यांना यात, सेंट-पर्सेंट.

निमित्त कोणतेही चालते मिटिंगसाठी
आता तो ब्रह्मराक्षस उभा नसतो भित्यापाठी
त्यांचा सारा सरंजाम त्यांचे समवेत असतो,
झेड सिक्युरिटी अन बाउंसर बौडी-बिल्डर सोबत असतो.

आपण सारे एक आहोत, नेते म्हणतात
जात-धर्म काहीच नाही, आमच्या नजरांत
गुज्जू-भाई नेहमीच केम-छे, सारो-छे म्हणतात,
मोहल्यात जाऊन त्यांच्या ते सभाही घेतात.

जिलेबी-फाफड्याचा आखला जातो बेत
स्वाद घेतला जातो पूर्ण,आणा-भाका घेत
गुज्जूमध्ये लोकप्रिय असणाऱ्या या स्वादिष्ट पदार्थाचे,
निमित्त असते सभेचे, लोकांच्या समस्या सोडवण्याचे.

राज-कारण केव्हातरी वेगळी खेळी खेळते
सर्व-धर्मियांच्या मनात स्थान निर्माण करते
अनोखी शक्कल निघते, नेत्यांच्या मेंदूतून,
मतांसाठीच हे सारे-सारे, जावे आपण समजून.

गुज्जूभाई आज खूष आहेत मनोमन
नेत्यांचे केलंय त्यांनी चांगलेच मनोरंजन
जिलेबी-फाफड्याचा स्वाद घेता-घेता,
नकळत राज-कारण खेळून गेले जाता-जाता.

नेते आता उद्याची तयारी करताहेत
गुज्जूभाईंच्या मनात आणखीन स्थान निर्माण करताहेत
उद्याचा त्यांचा विषय आहे भन्नाट,
बहुतेक त्यांचा विचार आहे,घालण्या थय-थयाट.

मंडप उभारण्यात आलाय रास-गरबा खेळण्यास
बाजूस व्यासपीठ उभारलंय नेत्यांसाठी, सभा घेण्यास
आणखी एक सोय करण्यात आलीय, मनोरंजनाची,
रास-गरबा खेळून,पुन्हा चर्चेस रिफ्रेश होण्याची.

आज जिलेबी-फाफड्या, उड्या रास-गरब्याच्या उड्या
मतांसाठी, हक्कांसाठी जातील ते कोणत्याही थराला
नेतील हे नेते आपणांस, सांगता येत नाही कोठवर,
अजब नेत्या तुझी गजब कथा, ऐकली नव्हती आजवर.

खराखुरा, जातिवंत नेता आम्हा कुठे सापडेल ?
जनतेच्या हितास तो नेहमीच अग्रेसर असेल !
आम्हा नकोत-जिलेबी फाफड्या अन रास-गरबा उड्या
साधे-सरळ असावे जीवन, तुला काय वाटतं रे गड्या !


-----श्री अतुल एस परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-12.07.2021-सोमवार.