ऊसाचा रस विक्रत्याचे मनोगत-" माझ्या रसवंती गृही या, ऊसाचा मधुर रस प्या !"

Started by Atul Kaviraje, July 13, 2021, 01:50:50 AM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

        ऊसाचा रस विक्रत्याचे मनोगत - मधुर गोड चारोळ्या
    " माझ्या रसवंती गृही या, ऊसाचा मधुर रस प्या !"- भाग-१
    ---------------------------------------------------

(१)
चरकासी बांधल्यात खुळ-खुळ घुंगुरमाळा
चक्राबरोबर पूर्ण होतंय कर्ण-मधुर आवर्तन
सवे गाण्याच्या गोड तान-लकेरीने माझ्या,
मधुर अमृत प्राशण्या मी देतोय आमंत्रण.

(२)
तृषार्त कंठा लागते माझ्या गृहाची ओढ
पाऊले आपसूक वळती चव घेण्या, ऊस-गुळाचा रस-गोड
जिभेवर चव रेंगाळीत, या अमृत-तुल्य देव-पेयाची,
मार्ग पुन्हा पुन्हा चोखाळिती माझ्या रसवंती-गृहाची.

(३)
चरकात ऊसाचे कांडे पिळले छान पहा
प्याला भरून वाहिला ऊस-रसाने कसा महा
लिंबाची फोड वरून पिळून,तरंगला बर्फ प्याल्यावर,
बखान करिती जन, ऊस-रसाचे मनसोक्त प्राशन केल्यावर.

(४)
माझा पाहुणचार तुम्हा नक्कीच आवडेल
ऊस-रसाचा भावही तुम्हा निश्चितच परवडेल
इतक्या महागाईतही मी नाही वाढवलेत रस-दर,
रसाच्या गोडीसम,मला भावते तुमचे वचन सुमधुर.

(५)
यंदा आलंय भरपूर पीक ऊसाचे शेतीला
पावसाचीही आहे मर्जी, पाट करून दिलाय ऊसाला
पर्जन्यदेवासी एकचं मागणे,दरसाली पड मनापासून,
पाण्याची आहे मायंदाळ गरज,ऊस-मळा फुलवण्याला.

-----श्री अतुल एस परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-13.07.2021-मंगळवार.