कोरोना व्हॅक्सिनेशन-वास्तव-गंभीर-कविता-"टीका-करण तर झाले, आता आणि काय राहिले ?"

Started by Atul Kaviraje, July 13, 2021, 01:19:19 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

मित्र/मैत्रिणींनो,

     कोरोनाच्या या पँडेमिकला, जागतिक संकटाला रोखण्यासाठी अंतिम उपाय म्हणजे लशीकरण, व्हॅक्सिनेशन. या उपायासाठी भराभर हालचाली होऊन शास्त्रज्ञांनी रात्रीचा दिवस एक करून कोरोनाची लस शोधून काढली. व ती सर्वांस देण्यासही सुरुवात झाली. पण इथे गणितच चुकत होते, कारण दिवसागणिक कोरोना  आपले स्वरूप बदलत होता. त्यानुसार लशींमध्येही बदल घडविण्यात येत होता.

     बातम्या अश्याही ऐकू येत होत्या, कि लसीकरणानंतराही त्या व्यक्तीस कोरोनाने ग्रासले होते. एक सुरक्षेचा उपाय म्हणून लसीकरण ठीक आहे. ती प्रत्येकाने घेतलीच पाहिजे, परंतु हे जागतिक संकट एवढ्यातच नमणार नाहीय, तर ते आपल्यासोबत यापुढेही कायम थोडया-फार प्रमाणात राहणारच आहे.

          आता उरलंय काय आपल्या हातात, तर सरकारने ज्या तीन नियमांचे सातत्याने पालन करण्यास सांगितले आहे- त्या म्हणजे, मास्क(मुखवटा परिधान  ----करणे),सॅनिटायझेशन( हातांचे वेळोवेळी औषधी जलाने आणि साबणाने प्रक्षालन करणे ) आणि सोशल डिस्टन्स ( सामाजिक अंतर ठेवणे आणि त्याचे सदैव भान राखणे). बस, यापुढे काहीही नाही, आणि हे सर्व आपल्या हातात, प्रत्येक नागरिकांच्या हातातले शेवटचे अस्त्र आणि शस्त्रही आहे. या तिन्ही नियमांचा आपण अंगीकार करून त्याचे जर मनातून कठोरपणे पालन केले तर, कोरोनाच काय, इतर कुठल्याही संकटांचा आपण एक होऊन निश्च्छितच मुकाबला करू शकू. चला सर्वांनी व्हॅक्सिनेशन करूया, स्व-संरक्षणासाठी लस टोचुया घेऊया, आणि आजपासूनच वरील तिन्ही नियमांचे काटेकोरपणे पालन करूया, आणि या जागतिक संकटास एक होऊन कायमचेच पळवून लावूया, ऐकुया तर या विषयावरील माझी पुढील कविता. कवितेचे शीर्षक आहे-"टीका-करण तर झाले, आता आणि काय राहिले ?"


        कोरोना व्हॅक्सिनेशन ( लस-टोचणी) वास्तव-गंभीर -कविता
           "टीका-करण तर झाले, आता आणि काय राहिले ?"
         -----------------------------------------------
     

                   
साऱ्या जगाला ग्रासून हा कळिकाळ
आता इतर ठिकाणेही शोधतोय
पसरण्या काहीच मिळाले नाही म्हणून,
बहुधा अंतराळाला गवसणी घालतोय.

१/२ वर्षांचा पूर्ण होऊन कालावधी
रामबाण उपाय नाही सापडला
अंती कसोशीने, शास्त्रज्ञांनी खपून,
कोरोना लसीचा शोध लावला.

व्हॅक्सिन घ्या, लस टोचून घ्या
सरकारने सर्वत्र फर्मान काढले
कोरोनापासून वाचण्याचा अंतिम उपाय,
वर्तमानपत्रांतून साऱ्या छापून आले.

व्हॅक्सिन घेण्या झाली गर्दी
भराभर लशी टोचून झाल्या
समाज-कंटकही होते सहभागी यात,
नकली लशी, पाण्याच्या दिल्या.

खूप काही घडले नंतर
या लशी देण्याच्या नावाखाली
दररोज बदलत्या नव्या बातम्या,
छापून आल्या होत्या मथळ्याखाली.

एक, दोन, तीन एकापाठोपाठ
लाटा नुसत्या येतच राहिल्या
बदलत्या स्वरूपास कोरोनाच्या सतत,
लशीही नाही रोखू शकल्या.

कोरोनाचे प्रस्थ वाढतच होते
पाहुणा पाहुणचार घेतच होता
घराबाहेर कसे काढायचे पाहुण्याला,
सरकारला विचार पडला होता.

जागतिक संकटच आहे हे
आणीबाणीचा आहे सारा काळ
कितीही उपाय केले तरी,
राहील कोरोना आपल्यासह सदा-सर्व-काळ. 

आपल्याच हाती आहे उपाय
कितीही लशी टोचल्या तरी
नियम पळून कसोशीने, कडकपणे,
व्हावे वर्तन सर्वांकडून, सर्वतोपरी.

मास्क,सॅनिटायझेशन,सामाजिक अंतर
प्रामुख्याने या तिन्ही गोष्टींचे
यापुढेही सर्वांकडून व्हावे पालन,
घालून दिलेल्या कठोर अटींचे.

आपल्याच हाती आहे संरक्षण
आपणच घ्यावी स्वतःचीच काळजी
प्रत्येकाकडूनच व्हावे हे वर्तन,
आज गरज आहे काळाची.

टीका-करण झाले, पुढे काय ?
या संभ्रमात नको राहूया
कोरोनाचा समूळ नाश करण्या,
एक होऊन लढा देऊया.


-----श्री अतुल एस परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-१३.०७.२०२१-मंगळवार.