आधुनिक तंत्रज्ञान कविता - "परदेशी मीडियाचा धिक्कार असो, देशी मीडियाचे स्वागत असो

Started by Atul Kaviraje, July 13, 2021, 11:30:12 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

मित्र/मैत्रिणींनो,

     हे डिजिटल युग आहे, सोशल मिडीयानी भरलेलं जग आहे. इंटरनेट द्वारा हवी ती जगभरच माहिती आपल्याला घरबसल्या अगदी क्षणार्धात मिळू शकते. मोबाइलचेही तसेच आहे. हे इटुकले पिटुकले खेळणे  हातात अगदी सहज मावते, पण त्याची ताकद अफाट आहे. सांगायचं मुद्दा, या  मोबाईल मध्ये अनेक ऍप्स असतात, कि ज्याद्वारे आपण माहिती जगात अगदी वेगाने फिरू शकतो. गुगल, ट्विटर, इंस्टाग्राम इत्यादी अनेक ऍप्सनी मोबाईलमध्ये जागा व्यापिलेली असते.

         मुद्दा असा की नुकतेच हे सोशल मीडिया ऑपरेट करण्याऱ्या काही लोकांनी असे एस एम एस किंवा विधाने, किंवा आपले व्युझ, मेसेजेस, टाकली होती, तर ही विधाने किंवा मेसेजेस या ऍप्स कंपन्यांना पटली नव्हती, ती त्यांना आक्षेपार्ह , विवासास्पद, संशयास्पद वाटून त्यांनी या लोकांचे ट्विटर, इंस्टाग्राम आणि अश्या अनेक ऍप्सवरून त्यांना चक्क वगळले, त्यांचे खाते डिलीट केले होते. यामध्ये आपल्या भारतातील काही मोठी असामी,सेलिब्रेटीस आणि बडी धेंडेही होती. सांगायचे राहिले, आपल्या मोबाईलमध्ये ही ऍप्स जी आपण वापरतोय, ती सारी परदेशी बनावटीचीच आहेत. यातला एकही ऍप्स आपला स्वतःचा असा नाहीय.

     यावर, असा मुद्दा उपस्थित होतो,की आपल्याकडे एवढे चांगले तंत्रज्ञान आहे, त्याचा वापर करून आपण आपली  स्वतंत्र ऍप्स का तयार करीत नाही. कशाला हवी ही परदेशीयांची मुजोरी. कू, टेलिग्राम, जिओ-चॅट आणि अशी अनेक ऍप्स आपण बनवली आहेत, त्याचा स्वतंत्र वापर व्हावा, जेणेकरून आपणास परदेशी ऍप्स वर अवलंबून राहावे लागणार नाही. त्यांच्या ऍप्सवर  बंदी घालून आपल्या भारतीय ऍप्स चा अवलंब यापुढे व्हावा.

     मित्रानो, चला तर शपथ घेऊया, कि आपण सारे यापुढे आपल्या देशात तयार होणाऱ्याच वस्तू वापरू, अगदी प्रत्येक बाबतीत. श्री भाऊ तोरसेकर या ज्येष्ठ राजकीय विश्लेषक आणि समीक्षक यांच्या यु-ट्यूब चॅनेल वर येणाऱ्या त्यांच्या "प्रतिपक्ष" या मथळ्या अंतर्गत हा विषय त्यांनी मागे मांडला होता. या विषयाचा संदर्भ  धरूनच मी एक कविता तुम्हा प्रस्तुत करीत आहे. कवितेचे शीर्षक आहे - "परदेशी मीडियाचा धिक्कार असो, देशी मीडियाचे स्वागत असो !"

     
                        आधुनिक तंत्रज्ञान कविता

      "परदेशी मीडियाचा धिक्कार असो, देशी मीडियाचे स्वागत असो !"
    -----------------------------------------------------------           


भविष्यकाळाचा वेध घेत मनुष्य
धावत्या तंत्रयुगात करतोय प्रवेश
डोळ्यांपुढे प्रगतीस विज्ञानाच्या ठेवून,
पाहण्यासारखा असतो त्याचा आवेश.

युग आलंय जगभर सोशल मीडियाचे
पीक फोफावलंय भरभर जलद बातम्यांचे
हातातील मोबाईल भरलाय नवनवीन ऍप्सनी,
गुगल, इंस्टाग्राम,ट्विटरच्या अनेक चित्रांनी.

अनेक माहितीचे ऍप्स आहेत स्रोत
आधुनिक घडामोडींवर टाकत असती झोत
माहिती तंत्रज्ञानात  मारलीय त्यांनी बाजी,
टक्कर देण्या त्यांना कोणी नाही राजी.

या विदेशी ऍप्सना भारतात आहे मागणी
होत आहे त्यांची भरघोस दिवसेंदिवस लावणी
मार्केट आहे खूप भारतात या ऍप्सना,
इतर देशांच्या तुलनेत त्यांची खूप झालीय पेरणी.

पण अवचित काहीतरी जाणूनबुजून घडतेय
या काही ऍप्सची मुजोरी पहा वाढतेय
इंस्टाग्राम, ट्विटरनी काही खाती बंद केलीत,
आगाऊ सूचना न देता ती अचानक रद्द केलीत.

काही एस. एम. एस. त्यांना वाटतात संशयास्पद
काही मेसेज त्यांना वाटतात,आक्षेपार्ह विवादास्पद
यात आहेत काही बडी धेंडेही देशातील,
अनुभवी आहेत ते आपल्या क्षेत्रातील.

हे काही नसेलही खरे कारण यापाठी
काहीतरी अंतर्गत देश-कारण दिसते यापाठी
हि डिजिटल युद्धाची नांदी तर नाही ना?
यात  काही काळे-बेरे तर नाही ना?

ज्या ऍप्सना भारतात आहे मार्केट
तेथे घेतली जाते ऍक्शन थेट
मुजोरी नाही चालणार या फिरंग्यांची,
गरज आहे देशाला आज देशी-ऍप्सची.

त्वरित बहिष्कार टाकला जावा या ऍप्सवर
ज्यांचा विश्वास नाही भारतीय नागरिंकावर
या सोशल मीडियाचा व्हावा देशात आपल्या सत्कार,
ज्यांना आवडतील नागरिकांचे नवं-आद्य विचार.

आहेत आपल्याकडेही काही सोशल मीडियाज
कू , टेलिग्राम, जिओ-चॅट, अन असतील अनेकही
व्हावा त्यांचा सर्वार्थाने अवलंब भारतात,
स्वीकारून त्यांना, अढळ स्थान मिळावे देशात.

आपला भारत देश, आपल्या देशाचा मीडिया
किती सुंदर असेल ही अभिनव कल्पना
देशाचे व्हा,फक्त देशी वस्तूच वापरा,
या विचारांना द्या वाव, नकोत फक्त वल्गना.

आपण आहोत आज स्वतंत्र विचारांचे
सावट नका लावू त्यांना गुलामीचे, पारतंत्र्याचे
आपलं स्वतःचे सोशल मीडिया गाजेल जगभर,
स्वाभिमानाने उंचावेल मग आपली मान वर.


-----श्री अतुल एस परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-13.07.2021-मंगळवार.