विनोदी-वास्तव-चारोळ्या-"गॅस महागला चूल मांडली,स्वयंपाकघरी चिमण्यांनी गर्दी केली"

Started by Atul Kaviraje, July 15, 2021, 02:20:12 AM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

           सिलिंडर (गॅस) महागाईवर विनोदी-वास्तव-चारोळ्या

   "गॅस महागला चूल मांडली,स्वयंपाकघरी चिमण्यांनी गर्दी केली"-भाग-१
  -------------------------------------------------------------

(१)
सिलिंडरचे भाव भिडले गगनास पाहता -पाहता
मध्यमवर्गीय ओरडू लागला, अब नही मुझे परवडता
फ्लॅटमधील सिलिंडरची जागा आज चुलीने घेतलीय,
प्रत्येक फ्लॅटच्या शिरोभागी धुरांडी दिसू लागलीय.

(२)
हर-तऱ्हेच्या,हर-आकाराच्या चिमण्या बाजारात आल्यात
घरोघरी, दिमाखात  स्वयंपाकघरी छती उंच विसावल्यात
चुलीने व्यापिले सारे किचन, हक्काने आणि आपलेपणाने,
आधुनिक किचनची परिभाषा बदलत चाललीय पूर्णपणे.

(३)
बी पी सी एल,एच पी सी एल,भारत चे गॅस प्लांट झालेत बंद
या मान्यवर कंपन्या आल्यात पूर्णपणे डबघाईला
रेडिमेड चुलीची दुकाने उघडलीत रस्तो-रस्ती ,गल्लो-गल्ली,
स्वस्त आणि मस्त एकमेव पर्याय उरलाय आता स्वयंपाकाला.

(४)
गॅस सिलिंडर बंद पडल्यामुळे,गॅस शेगडी गेलीय माळ्यावर
तोटा सहुनही त्यांचे डोके अजूनही येत नव्हते ताळ्यावर
इतिहासाची पाने मी आज चाळून पाहत होतो,
चुलीवरच्या जेवणाचा सोबत छान आस्वाद घेत होतो.

(५)
गच्चीवरच्या टी व्ही अँटेनाची जागा आज धुरांड्यानी घेतलीय
भकाभक धूर ओकीत सारी धुरांडी काळवंडलीत
आकाशात दाटून आलीय मळभ,सूर्यही लोपून गेलाय,
प्रदूषणाचा आणि एक नवीन प्रवास सुरु झालाय.


-----श्री अतुल एस परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-15.07.2021-गुरुवार.