राजकारण वास्तव कविता - "चौकशी करतेय नेत्यांची इ.डी., पळता भुई झालीय थोडी !"

Started by Atul Kaviraje, July 15, 2021, 11:31:23 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

मित्र/मैत्रिणींनो,

     नेत्यांची सर्व लपवलेली संपत्ती, अवैध खाती, बेहिशोबी संपदा, आणि इतर बरच काही, जे बेकायदेशीर आहे, बेनामी आहे, अश्या गोष्टींची उकल करण्या, त्यांना उघड्यावर आणण्या सरकारने पूर्ण हक्क दिलेली इ डी हि संस्था उदयास आली आहे. यापाठी कोण आहे हे अजूनही कळलेलं नाही. पण, त्यांनी या सर्व नेत्यांची, व्यवस्थित चौकशी करून,त्यांच्येवर धाडी घालून, त्यांना पळता भुई थोडी केली आहे, हे नक्की.

          गलिच्छ राज-कारण स्वच्छ व्हावे, कदाचित या इ डी चा यापाठी मुख्य उद्देश असावाही. पण ते जे समाज-हिताचे कार्य करीत आहे, त्यामुळे सामान्य नागरिक थोडासा सुखावल्याचे दिसत आहे. राज-कारणात चाललेला अनागोंदी कारभार, अराजकता, थोड्या का प्रमाणात होईना, त्यांना आळा घालण्यात यश आले आहे. ऐकुया तर राज-कारणावरील आणि एका ज्वलंत समस्येवरील कविता. कवितेचे शीर्षक आहे-"चौकशी करतेय नेत्यांची इ.डी., पळता भुई झालीय थोडी !"

                    राजकारण वास्तव कविता

   "चौकशी करतेय नेत्यांची इ.डी., पळता भुई झालीय थोडी !"
   ----------------------------------------------------

नावही कधी नव्हते या इ.डीचे ऐकलेले
अचानक आली होती ती प्रसिद्धी- झोतात
कारवायांनाही आला होता अवचित ऊत,
राज-कारणी पळत होते, पाठी लागल्यासारखे भूत !

असे काय आहे या इ डी त ?
काय आहे या इ डी ची ख्याती ?
ऐकलय, मूळांपर्यंत सखोल जाऊन इ डी,
वदवून घेतेय त्यांचेकडून ए बी सि डी.

वागणं होत साऱ्यांचच धीर आणि गंभीर   
आतापर्यंत होत कसं सारं सारं स्थिर
जेव्हापासून झालीय इ डी ची चौकशी सुरु,
मन डगमगतंय होतंय कसं अस्थिर.

बेहिशेबी, बेनामी,सारी संपत्ती अन संपदा
काढतेय खणून, आलीय त्यांचेवर अनाहूत आपदा
इ डी आमंत्रण देतंय कचेरीत चौकशीस कित्येकदा,
उत्तरं देण्यापूर्वी विचार करताहेत ते शंभरदा.

श्वानांहूनही आहेत तीव्र, अति-तीव्र घ्राणेंद्रिये
सुगावा लागतोय इ डी ला लांबूनच कारभाराचा
इ डी चे होतात कान ऐकूनच त्वरित खडे,
लगेच होते कारवाई, खणण्या मुर्दे गडे.

कोणाचा आहे हात या कारवायांपाठी ?
कोण आहे खरा सूत्रधार या साऱ्यापाठी ?   
कोण आहे खरा माय - बाप इ डी चा ?
विस्तीर्ण आहे वृक्ष पसरलाय अजानुबाहू इ डी चा !

नागरिक सामान्य अजाणच होता आजवर
त्याच्या ऐकण्यात नव्हता हा कधी समाचार
आज तेही झालेत अचंबित ऐकून,
ज्या नेत्यांवर होते तेही विसंबून.

वरवरचे होते दिखावे सारे सारे
डोंगर होते लांबूनच दिसत न्यारे
पण छुपे रुस्तुमच निघाले होते ते,
काल वहात होते प्रामाणिकतेचे वारे.

काल-प्रवाह वहात होता आज उलटा
इ डी करीत होता त्यास सुलटा
नवं नवीन बातम्यांचे पीक येत होते,
भ्रष्टाचाराचे शेत बहरून लहरत होते.

इ डी ने चांगला आदर्श घालून दिलाय
आज या गोष्टींना आळा बसत चाललाय
सु-पंथावर, सु-मार्गावर चालण्या त्यांना
इ डी ने मदतीचा हात दिलाय.

पथ-भ्रष्ट होत चाललेले त्यांचे जीवन
इ डी ने आज स्व-कर्तृत्त्वाने चांगलचं सावरलंय
सन्मार्गाने जीवन जगण्या यापुढे त्यांचेकडून,
विश्वासाचे अन शपथेच ब्रीद घेतलंय.

अश्या अनेक समाज-हीत संस्था
यापुढेही पुढे होऊन कार्यरत राहाव्यात
लवलेशही नाही उरणार मग विषमतेचा,
धडा घालून दिलाय त्यांनी समतेचा.


-----श्री अतुल एस परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-15.07.2021-गुरुवार.