आनंद रंग

Started by शिवाजी सांगळे, July 16, 2021, 08:49:53 AM

Previous topic - Next topic

शिवाजी सांगळे

आनंद रंग

आनंद डोही तरंग...जेव्हा भेटे पांडुरंग
मुखी जप हरीचा ध्यानी संतांचे अभंग

अलौकिक सोहळा...महिमा थोर वारी
देहभान विसरे चालता..भक्ताचांच संग

होता भेट देवाजीची जीवा लाभे सुख
मन पंढरी पंढरी होतसे...रोम रोम दंग

सावळे ते ध्यान..अवघे चैतन्याचे रूप
कौतुक सर्वां अपार...मुखी एक श्रीरंग

©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९
©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९