जीवन-मरण संघर्ष कविता - "देव तारी त्याला कोण मारी, जीवन मृत्यूवरही मात करी"

Started by Atul Kaviraje, July 17, 2021, 12:38:10 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

मित्र/मैत्रिणींनो,

     उत्तर प्रदेशातील, गाझियाबाद या ठिकाणी घडलेली हि खरी बातमी, मी काल म्हणजे दिनांक-१६.०७.२०२१-शुक्रवार रोजी, संध्याकाळी लोकमत या वृत्त-वाहिनी वर यु-ट्यूब  चॅनेल वर व्हिडीओ द्वारे प्रत्यक्ष पहिली. एका उंच इमारतीतील नवव्या मजल्यावरच्या फ्लॅट च्या बाल्कनीतून एक स्त्री तोल जाऊन खाली पडत होती ,आणि तिचा तो जाणारा तोल तो पुरुष बाल्कनीतून वाकून स्वतःच्या हाताने सावरीत होता. तिचा हात त्याने आपल्या हाताने घट्ट धरून ठेवला होता. त्याच परिस्थितीत ती स्त्री मृत्यूशी झुंज देत कितीतरी वेळ अशीच लोम्बकळत होती. जीवन मरणाची ही कसरत अनेक नजर पाहात होत्या. काही सेकंदात घडलेली हि घटना घडली होती. पण पाहणाऱ्यांच्या काळजाचे  पाणी पाणी करून गेली.

     नंतर, वृत्तानुसार असे कळले कि नवऱ्या बायकोच्या भांडणाचे पर्यावसान असे आत्महत्त्येत होत होते. रागाला डोळे नसून, तिची सारासार विचारबुद्धी भ्रष्ट होऊन तिने हा अंतिम अंध निर्णय स्वतःच्या हाताने घेतला खरा. पण तेव्हा तिला मरणाची खरी चाहूल लागली, जेव्हा ही अविचाराची तिची वर्तणूक तिला स्वतःलाच गिळू लागली. अचानक तिचा तोल गेला, आणि  या धैर्याचे रूपांतर मग भीतीत झाले. काहीच नाही कळले, त्या दोघांना, क्षणार्धात हे घडून गेले, पण तिच्या नवऱ्याने प्रसंगावधान राखून, मनावरचा तोल ढळू न देता, संयम बाळगून, तिचा हात विजेच्या वेगाने आपल्या हाती घट्ट पकडून ठेवला.

     तोपर्यंत इमारतीच्या खाली जमलेल्या जमावाने तिच्या सुरक्षेसाठी तळाला जमिनीवर गाद्या-गिरद्यांची उंच भिंत निर्माण केली होती. शेवटी हाताला रग लागून नवऱ्याने तिचा हात सोडला, व तेथे जमलेल्या प्रत्यक्षदर्शी जमावाच्या किंचाळ्यात ती स्त्री पाहता पाहता नवव्या मजल्यावरून खाली पडली. आणि किरकोळ दुखापत होऊन त्या रचून ठेवलेल्या संरक्षणाच्या भिंतीवर जाऊन आदळली. नंतर तिला इस्पितळात दाखल केले गेले हे सांगायलाच नको. मित्रानो, सांगायचं मुद्दा म्हणजे, जगण्याने मरणावर आज मात केली होती. देव तारी त्याला कोण मारी ?, परंतु खरा मुद्दा असा कि अविचाराने, आपल्या हातून असे आत्म-घातIचे  गैर-वर्तन अवचित घडते, ते टाळले तर जीवनाचे गणित आपोआप सुटत जाते.त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत आपली विवेक-बुद्धी ढळू देऊ नका. ऐकुया तर उपरोक्त विषयावरील जीवन-मरणाच्या संघर्षावर एका गंभीर कविता. कवितेचे शीर्षक आहे-"देव तारी त्याला कोण मारी, जीवन मृत्यूवरही मात करी"


                    जीवन-मरण संघर्ष कविता
    "देव तारी त्याला कोण मारी, जीवन मृत्यूवरही मात करी"
   -------------------------------------------------
                   

देव तारी त्याला कोण मारी
प्रचिती अजुनी येथे येते खरी
देवाचा ज्यावरी असेल वरद-हस्त,
मरणही नसते त्याचे स्वस्त.

नशिबाचाही मोठा वाटा जगण्यात
नियतीही तेथे टेकते गुडघे
मरणही जाते परतुनी शरणागत,
जीवनाचे मिळते वरदान अवघे.

वचने साता-जन्माची देता जीवनभराची
गाठ सप्त-पदीची जाते बांधली
काळ जाता, काल-प्रवाहात सारी,
पदो-पदी ती जातात विसरली.

आक्रस्ताळेपणा असा टिपेला जावा
सूर तिचा आत्म -घातात रुजावा
नवरा-बायकोच्या वादाचा का ,
हाच अंतिम उपाय ठरावा ?

मनुष्याचे मन जाणिले कुणी ?
त्याला औषध नाही अजुनी !
वाद तर होताच असतात,
त्याचे पडसाद उमटतच असतात.

रागावर नसते मनाचे नियंत्रण
विवेक-बुद्धी सरसकट मात खाते
विपरीत विचारांचा विजय होऊन,
अंध वर्तन हातून घडते.

मृत्यू प्रतीक्षेत आहे खोल-डोही
मार्ग आत्म-हत्येचा स्वीकारला जाई
पराकोटीला जात वाद पेटत,
वाट पहातेय मरणाची खाई.

जीवनाचाच तोल जातोय इथे
मरण स्वस्त झालेय इथे
जीवनाच्या एकत्र जगण्याच्या आणाभाका,
पायदळी तुडविल्या जातात इथे.

अवचित नवल घडतेय नकळत
धैर्याचे रूप घेतेय भीती
जीवनाचा तोल अचानक सावरीत,
त्याच हात आहे तिचे हाती.

अंती प्रेमाचाच होता विजय
मृत्यूचा होतो निष्फळ पराजय
जन्मोजन्मीचे हे दृढ बंधन,
अतूट असते, असते अजेय.

ज्या हातानी वाचविले तिज
त्या हातात देव दिसतो
मृत्यूलाही सहज परतून लावणारा,
दैवाचा अनोखा खेळ असतो.

यातून एक धडा शिकावा
क्रोध आवरावा, संयम बाळगावा
रागाचे डोळे मिटलेले असतात,
अनर्थाची वाट पाहात असतात.


-----श्री अतुल एस परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-17.07.2021-शनिवार.