सहकार - (एक चळवळ) -कविता - "एकच ध्येय, अंतिम विचार"

Started by Atul Kaviraje, July 18, 2021, 01:04:02 AM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

मित्र/मैत्रिणींनो,

     अन्यायाशी मुकाबला करायचा असेल तर आपण सर्वांनी एक होणे आवश्यक आहे, आपल्या एकत्र येण्याने, आपल्या एक होण्याने अशी एक मजबूत साखळी निर्माण होईल की जी तोडणे केवळ अशक्य, आणी हि साखळी जेव्हा तयार होईल तेव्हा खूप काही चांगले घडेल आणि घडवूनही जाईल.

     मित्रानो, तर  या एकी-वर एक सुंदर कविता ऐकवितो. माझ्या कवितेचे शीर्षक आहे - "एकचं ध्येय, अंतिम विचार"


                         सहकार - (एक चळवळ) -कविता
                       --------------------------------

===============
"एकच ध्येय, अंतिम विचार"
===============

एकच ध्येय, अंतिम विचार
नाही उद्धार, विना सहकार
एकच ध्येय, अंतिम उद्गार,
सहकारानेच उडवून देऊ हाहाःकार !

नाही तरणोपाय, विना सहकार
चळवळ  हेच शस्त्राचे भांडार
एकाचे दोन, दोनाचे चार,
मुठीत  तळपे, एकीची तलवार !

अन्यायाची शकले उडवीत वारंवार
पतितांचा करीत स्वहस्ते उद्धार
विषमतेचे जहरी हलाहली फुत्कार,
दमित, समतेचा करीत पुरस्कार.

असे अनेक विश्वासाचे जोडीदार
लाभताच विकास नाही लांब-फार
सहकारानेच हे शक्य होणार,
एकच ध्येय, अंतिम विचार.

एकच ध्येय, अंतिम विचार,
विना सहकार, नाही उद्धार.


-----श्री अतुल एस परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-18.07.2021-रविवार.