टाळले त्यांनीच होते

Started by कवी अमोलभाऊ शिंदे पाटील, July 18, 2021, 09:42:30 AM

Previous topic - Next topic

कवी अमोलभाऊ शिंदे पाटील

लक्तरे हृदयाची जाळले त्यांनीच होते
अत्तरे हृदयाची लावले त्यांनीच होते

हा देह झिजून गेला संसार जोडण्यात
सुख कमवून सारे टाळले त्यांनीच होते

किती माघार घेऊ ही सांग देवा तू तरी
वफदार कुत्र म्हणून पाळले त्यांनीच होते

एक एक थेंब घामाचा न्याय मागत आहे
या कष्टकरी देहाला साळले त्यांनीच होते

आता सहानभूती नको मोकळी द्या ओ थोडी
जिवंत असून रक्तातून वगळले त्यांनीच होते

कविराज...अमोल....
मो.९६३७०४०९००.अहमदनगर