कर्तव्य-दक्ष स्त्री चारोळ्या - "चहा टपरीवरील विक्रेत्या मुलीचे मनोगत"

Started by Atul Kaviraje, July 18, 2021, 12:00:37 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                   कर्तव्य-दक्ष स्त्री चारोळ्या
       "चहा टपरीवरील विक्रेत्या मुलीचे मनोगत"-भाग-१
      -------------------------------------------


(१)
बाबांची नोकरी गेलीय कोविडमुळे
हतबल, असहाय्य अवस्था नाहीय पहावत
डोळ्यांतले अश्रू पुसत मीच झाले पुढे,
मीच घराची कर्ती असल्याचे कळले यापुढे.

(२)
आईच्या डोळ्यांतले पाणी नव्हते खळत 
आई-बाबांचे गळूनच गेले होते अवसान
सावरत त्यांना मी दिले आश्वासन निर्धाराने,
दोघांनाही घेत जवळ, आईपणाच्या ममतेने.

(३)
आज मीच कर्ती घराची
मीच झालेय त्यांचा मुलगाही
निग्रहाने मनाशी केलाय निश्चय,
घर चालवायचे, उपायांनी कोणत्याही.

(४)
डोळ्यांपुढे निश्चित नव्हती दिशा
कोणत्याही धंद्यात आहे बरकत
लहान-मोठे कुठलेच नसते काम,
विश्वास आणि प्रामाणिकपणाचे पाठी असते नाम.

(५)
आज स्टोल आहे माझा, चहाचा
प्रण केलाय मी आजपासून मेहनतीचा
बाबांची मदत घेऊन सोबतीस,
चहा पाजते मी तुम्हा प्रेमाचा.

(६)
ग्राहक बरेचसे येती तल्लफ भागवायला
मागणी आहे खूपच माझ्या चहाला
आहे खूप मेहनत, एक नोकरीच म्हणा ना,
सकाळपासून अथक सेवा द्यावी लागते, ग्राहकांना.


-----श्री अतुल एस परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-18.07.2021-रविवार.