नवल कविता- "धावत्या मेट्रोत नारी, फॅशन वॉक करी !"

Started by Atul Kaviraje, July 19, 2021, 11:57:42 AM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

मित्र/मैत्रिणींनो,

     आणखीन एक डोक्यांतून निघालेली अभिनव शकलेची कविता. मेट्रो रेल्वे प्रशासनाने मेट्रोत गर्दी खेचून आणण्यासाठी, जी शक्कल लढवली आहे, तीस तोड नाही, चक्क त्यांनी धावत्या मेट्रोत, युवतींना फॅशन वॉक करण्यास स्टेज दिला आहे. त्यांचा उद्देश्य कदाचित वेगळाही असावा, पण माझे कवी मन या गोष्टीस एका वेगळ्या कवितेच्या दृष्टीने पहातंय. 

     ऐकावे ते नवलंच, अश्या धर्तीवरचा हा अभिनव उपक्रम आहे असे मला वाटत, कारण काहीही असेना, प्रवाश्यांची मात्र घटकाभर करमणूक या फॅशन वॉक करणाऱ्या युवतींनी केली, हे मात्र खरं, ऐकुया तर या विषयावर एक खुसखुशीत, मेट्रोच्या वेगाने धावती, थोडीशी विनोदाची झाक असलेली, सौंदर्यवती कविता. कवितेचे शीर्षक आहे- "धावत्या मेट्रोत नारी, फॅशन वॉक करी !"

     
                          धावत्या मेट्रोत फॅशन वॉक
                                 नवल कविता 
                  "धावत्या मेट्रोत नारी, फॅशन वॉक करी !"
                --------------------------------------


मेट्रो धावतेय, रूळ पळताहेत
प्रवासी बसल्या-बसल्या जाम्भई देताहेत
कोणाकडे कोणी पहात नाही ढुंकूनही,
बाहेरचे दृश्यही त्यांना आता ओळखीचे होई.

हळू-हळू गर्दी आताशी, लागलीय पांगू
धावती मेट्रो होऊ लागलीय हळू-हळू पंगु
त्यातच कोविडची आलीय जागतिक महामारी,
प्रवास आता रेल्वेतून कोण बरे करी ?

मेट्रो रेल्वे चाललीय डबघाईला
धावत्या वेगाला जणू तिच्या ब्रेकच लागला
हे नुकसान मेट्रोला झाले परवडेनासे,
रेल्वे अधिकारी सोडू लागले दुःखाचे उसासे.

मेट्रो रेल्वे प्रशासनाला भन्नाट शक्कल सुचलीय
त्याने मेट्रो रेल्वेची किस्मत जणू खुललीय
या उपायाने त्यांना चांगलीच बरकत आलीय,
पुन्हा एकदा मेट्रो रुळावर जोरात धावू लागलीय.

कोविडमुळे फॅशन वॉक मुलींना आले होते अपंगत्त्व
सौंदर्य सरत होते, त्यांचे संपले होते महत्त्व
बंद झाली होती कवाडे स्टेजची, बंद झाले होते प्लॅटफॉर्म,
या अभिनव योजनेने त्यांना आलाय नवीन फॉर्म.

आता त्या वॉक घेताहेत पुन्हा मांजर-चालीने (कॅट वॉक)
मेट्रो पुन्हा धावू लागलीय, व्याघ्र-गतीने
डबे पुन्हा खुललेत, प्रवासी सारे भरलेत,
रेल्वे प्लॅटफॉर्म नव्याने गर्दीत ओसंडू लागलेत.

कमनीय, सौंदर्यवती, नट-मोगऱ्या,अवखळ युवतींनी
भरून गेलेत मेट्रोचे पूर्ण-सारे डबे
उभ्या रमणीना चालताना पाहून, मादक चालीने,
खूष झालेत प्रवासी, राहिलेत मान देण्या उभे.

सजलीत स्थानके, चढलाय वेगळाच रंग मेट्रोला
ही नवलाई पहाण्या प्रत्येकजण आलाय घाईला
आजवर कधीही न पाहिलेले, न ऐकलेले नवल,
मेट्रोने पुन्हा नाव मिळवून दिले जगी, मुंबईला.

युवतींना नोकऱ्या मिळून, पुन्हा मिळाला प्लॅटफॉर्म
मेट्रोत त्यांचे स्वागत होत होते, उबदार आणि वॉर्म
प्रवाश्यानी गाडी भरलीय खचाखच, तोबा झालीय गर्दी,
फॅशन वॉक पहाण्या महाग तिकीट काढून, आले होते दर्दी.

मेट्रोने एक तीर मारून , तीन निशाणे साधलेत !
पहिला निशाणा-फॅशन वॉकचे स्टेज युवतींना देऊन
दुसरा निशाणा-प्रवाश्यांच्या प्रवासाचे तिकीट महाग करून,
तिसरा निशाणा-नव -योजनेने डबे प्रवाश्यानी खचाखच भरून.

मेट्रोने बेसुमार जमवलीय योजनेने या, संपत्ती
साखर वाटण्या मुंबईभर ठेवलेत त्यांनी पन्नास हत्ती
अधिकाऱ्यांचे पगार वाढलेत, भरपूर करताहेत कमाई,
आता आणखीन अश्याच योजना राबविण्या मेट्रोला लागलीय घाई.

रुसलेली मेट्रो धावता-धावता हळूच हसू लागलीय
फॅशनेबल युवतींच्या सान्निध्यात राहून ती अति-सुंदर दिसू लागलीय
तिचा वेग आणखीन वाढलाय या खुशीतच,
असे आगळे-वेगळे चित्र दिसते, फक्त मुंबईतच.


-----श्री अतुल एस परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-19.07.2021-सोमवार.