रस्त्याचे दुखणे - वास्तव-कविता-"जागोजागी पडलेत खड्डे, वाहनांचे अडलेत घोडे"

Started by Atul Kaviraje, July 19, 2021, 11:29:34 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

मित्र/मैत्रिणींनो,

      रस्त्याचे खड्डे बुजवायचे, नवीन रस्ते करायचे, काही काळाने नवीन खड्डे पुन्हा तयार. पुनः ते बुजवायचे, पुन्हा नवीन रस्ते बांधायचे , हे चित्र आपण नेहमीच पहात आलोय, आता तर ते अंगवळणीच पडलंय.

     नक्की या रस्ता बांधणीचे काय आहे तंत्र, कोठे आहेत याचे तंत्रज्ञ ? न तुटणारा, न मोडणारा रस्ता, एक सुंदर रस्त्याचे बांधकाम आम्हास कधी पहावयास मिळणार ?
की असेच चालायचे या रस्त्यावरूनी खड्डे चुकवून,आयुष्यभर. एक विचार करण्यासारखी, गंभीर गोष्ट. मित्रानो एक विनोदी झालर असलेली कविता, या रस्ता बांधणीवर. कवितेचे शीर्षक आहे - "जागोजागी पडलेत खड्डे, वाहनांचे अडलेत घोडे"


                      रस्त्याचे दुखणे वास्तव-कविता
                     ---------------------------


=========================
"जागोजागी पडलेत खड्डे, वाहनांचे अडलेत घोडे"
=========================


आमची मुंबई, सुंदर मुंबई
कुणीही यावे, फिरून पाहावे
वस्तीस राहावे, घर वसवावे,
आमची मुंबई, महान मुंबई.

मुंबईच्या रस्त्यांना लागलंय आजकाल गालबोट
पावसाळ्यात चालवावी लागते त्यावरून बोट
प्रचंड पाणीसाठा कमी म्हणून की काय,
जागोजागी खड्ड्यात अडकून पडतात पाय,

खात्यात चाललाय चांगलाच भ्रष्टाचार
बांधकाम खाते भलतंच खातंय अष्टोप्रहर
निकृष्ट दर्जा असतो रस्त्याच्या खडीचा,
कालांतराने रस्ता तयार होतो, खड्डया खड्ड्यांचा.

वाहनांची चाललीय विचित्र जुगलबंदी
खिळखिळी झालीत चाके, मधेच गाडी कोलमडी     
इप्सित स्थळी पोचण्यास लागे दुय्यम वेळ,
खड्ड्यांनी चक्क चालवलाय वाहनांशी खेळ.

निदान पाद-चाऱ्यांचे तरी राहावेत पाय धड
एकसंध राहावे, चालता चालता त्यांचे धूड
सर्वाना चांगलीच झालीय सवय आताशी खड्ड्यांची,
अन एका-दमात, जोरात त्यावरील उडयाची.


     मित्रानो , हे चित्र कधी बदलणार ?


-----श्री अतुल एस परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-19.07.2021-सोमवार.