फुलपाखरू कविता-"फुलांवर उडणारे फुलपाखरु मी"

Started by Atul Kaviraje, July 20, 2021, 12:57:17 AM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

 मित्र/मैत्रिणींनो,

     सुंदर, मोहक, रंगीबेरंगी फुल-पाखरावर एक कविता. विविध-रंगी, विविध-रुपी, नाजूक पंखांचे, सहजतेने उडणार,फुलांफुलांवर बसणारे फुल-पाखरू कुणाला आवडत नाही ? फुलांचा सुगंध, फुलाचे पराग-कण, फुलांचे विविध रंग, वाटत ते इतस्ततः मुक्तपणे उडत असते, विहरत असते, ते कुणाच्या बंधनात नसते. विध्यात्याने मुक्त हस्ताने विविध रंगांची उधळण करून, फुल-पाखरांना आणि त्यांच्या पंखांना  वेगळेपण आणले आहे. 

          ऐकुया तर, फुल-पाखराचे कवितारूपी मनोगत, आपल्या शब्दातून ते आपणास काय सांगायचं प्रयत्न करतेय, काय संदेश देतेय. कवितेचे शीर्षक आहे-"फुलांवर  उडणारे  फुलपाखरु  मी"


                           फुलपाखरू कविता
                   "फुलांवर  उडणारे  फुलपाखरु  मी"
                  ---------------------------------


प्रत्येक  फुलाला  मोह  माझा
मलाही  आकर्षण प्रत्येक कुसुम-दलाचे
फुलांना आवडणारे  पाखरू  मी ,
फुलांवर  उडणारे  फुलपाखरु  मी .

बाग बागेत विहरतोय  मी
फुला फुलांवर बसतोय मी
तुम्हाला सुंदर रंग देतोय मी,
सुगंधाची मुक्त उधळण करतोय मी.

आज  इथे  तर  उद्या  तिथे
मुक्त  संचार  करतोय  मी
दुजाभाव  नाही  मजकडे  फुलांचा,
परागाचें  सिंचनही  करतोय  मी .

मुक्त ,स्वच्छंद  विहरू  द्या  मला
या  फुलांसवे  खेळू  द्या  मला
हेच  आहे  माझे  जीवन  रोजचे ,
फुलांना  आणि  फुलांपासून  तोडू  नका  मला .

नाजूक  सुंदर  पंखांना  माझ्या
विधात्याने   दिलीय  दैवी  देणगीच
विनवणी  एकच  माझी  तुम्हा ,
क्रूरपणे  त्यांना  हाताळू  नका .

एकच  संदेश  माझ्याकडून  तुम्हा --
माझ्यासवे उडायला शिका
प्रत्येक फुलाला  पाहायला शिका
त्याचा सुगंध ओळखायला शिका,
तो प्रत्येकाला द्यायला शिका.


-----श्री अतुल एस परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-20.07.2021-मंगळवार.