कान्हा -गौळणी प्रेम कविता - "कृष्ण - वेड्या गौळणी"

Started by Atul Kaviraje, July 20, 2021, 06:22:37 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

मित्र/मैत्रिणींनो,

     राधा-कृष्णाची प्रेम कहाणी तर सर्व परिचित आहेत. पण आपणास माहित आहे का, गोकुळातील सर्व गौळणींचाही कान्हावर तेवढाच हक्क होता, जेवढा राधेचा. कान्हाच्या एक नजरेस, मुरलीच्या तानेसाठी, त्याच्या प्रेमळ शब्दांच्या त्या वेड्या होत्या. गौळणींचे कृष्णावर शुद्ध, निखालस प्रेम होते. तो त्यांचा प्रत्यक्ष देवच होता.

     ऐकुया तर ही आगळी वेगळी कान्हा-गौळणी प्रीत कविता, कवितारूपी प्रेम - कहाणी. या प्रेम-कवितेचे शीर्षक आहे- "कृष्ण - वेड्या  गौळणी"


                       कान्हा -गौळणी  प्रेम  कविता
                         "कृष्ण - वेड्या  गौळणी"
                       -------------------------


असे  कृष्णात  काय  पाहीले
असे  कान्हात  काय  दिसले
त्या  निळ्याशार  डोळ्यांतले  प्रेम -भाव ,
की  ओठांवर  रुळणारी  पाव्याची  सुमधुर  तान .

शुद्ध ,सात्त्विक  बोल  प्रेमाचे
की  नितळ , मंगल  भावच  अंतरीचा
सारे  सारे  भुलून  गौळणी  निघाल्या ,
त्यांच्या  मूर्तिमंत  अमूर्त  देवास  पाहण्याला .

कृष्ण  कृष्ण  कान्हा  कान्हा
दुजा  जपच  माहित  नव्हता  गौळणींना
झोकून  देण्या  होत्या  साऱ्या  तयार ,
फक्त  त्याच्या  एका  प्रेमळ  शब्दाला .

एक  नजर  फक्त  कान्हाची  पडण्या
साऱ्या  गोपिकांनी  केले  जीवाचे  रान
हरपून  जात  माझेही  अवचित  भान ,
अन  स्फुरले  मज  एक  सर्वोत्तम  कृष्ण -गान------

मुरली वाजवी कान्हा गोकुळी
सुमधुर लय, तान ही कोवळी
रूप कान्हाचे अप्रतिम पहाण्या,
धावल्या त्या वेड्या गौळणी.

कान्हा माझा कृष्ण माझा
भांडू लागल्या त्या साऱ्याजणी
प्रीत तयांची वाटून घेत हलकेच,
करीतो  कान्हा तयाना ऋणी.

राधा  बावरी  आज  नव्हती  बावरी
समजूत  घालुनी  मनास  सावरी
साऱ्या  गौळणीचा  कान्हा असला  जरी ,
खरी  प्रीत  तो  मजवरीच  करी .


-----श्री अतुल एस परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-20.07.2021-मंगळवार.