भूक दर्शनाची

Started by शिवाजी सांगळे, July 20, 2021, 07:26:39 PM

Previous topic - Next topic

शिवाजी सांगळे

भूक दर्शनाची


पांडुरंग दर्शनाची लागली भक्तांना भूक
कसे जावे भेटीस मनी कोरोनाचा धाक

थकून गेले तनीमनी किती करावा धावा
कहर महामारीचा आता तुम्ही आवरावा

ओढ वारीची देवा लागली आम्हा भक्तां
सांगा तुम्ही देवा काय करू आम्ही आता

असूनही रे वास तुझा, चराचरी जगताना
लोटलाय काळ मोठा, येऊ दे तुज दर्शना

कृपावंत माऊली तुच अवघ्या विश्वाची
घ्यावी काळजी तुम्ही थकल्या भक्तांची


©शिवाजी सांगळे 🦋papillon
 संपर्क: +९१ ९५४५९७६५८९
©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९