II श्री विठ्ठल II - कोरोना - वास्तव चारोळया - "दिंडी निघाली एस. टी. ने पंढरपूरल

Started by Atul Kaviraje, July 20, 2021, 11:09:35 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                         II श्री विठ्ठल II
                   कोरोना - वास्तव चारोळया 

             "दिंडी  निघाली एस. टी. ने पंढरपूरला "
                            (भाग -४)
             ----------------------------------

(१६)
आता माझीही थकलीत पाऊले
दर्शन विठ्ठलाचे मी घेतोय वडाळयाला
पद-यात्रा केव्हाचीच झालीय बंद,
नजरेत भरून घेतोय मी विठ्ठलाला.

(१७)
विठ्ठलाला आज झोप येत नाहीय
परततोय तो या कुशीवरून त्या कुशीवर
रखुमाई म्हणतेय देवशयनी आहे महिने सहा ,
यापुढे भक्तांवाचूनच तुम्हाला रहायचंय पहा.

(१८)
विचार करतोय पांडुरंग,आता वेळ आली आहे
कटीवरून हात काढण्याची पाळी आली आहे
पुन्हा आणखी एक सूक्ष्म अवतार घेऊन,
कोरोनारूपी विषाणू-राक्षसाचे संपूर्ण पारिपत्य करायचे आहे.

(१९)
पंढरपूर आजही गजबजते आहे
विठ्ठलाच्या कीर्तनात रंगते आहे
भक्तांची रीघ कमी झाली जरी,
नित्य-नेमे वारी होतंच आहे.

(२०)
पंढरपूरच्या माऊलीच्या दर्शनाची वाट
आज ओकी -बाकी झाली आहे.
वारकऱ्यांचा जथ्याचा जथा घेऊन लाल-परी,
त्याच वाटेवरून सुसाट धावत चालली आहे.


-----श्री अतुल एस परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-20.07.2021-मंगळवार.