वास्तव-जीवन कविता - "माझेच कलेवर मी पहातोय !"

Started by Atul Kaviraje, July 21, 2021, 11:34:49 AM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

मित्र/मैत्रिणींनो,
 
     "माझेच कलेवर मी पाहतोय", या प्रस्तुत कवितेतून, मी या ढोंगी समाजावर प्रकाश-झोत टाकण्याचा निष्फळ प्रयत्न केला आहे. कारण मला माहित आहे, कि कितीही केले तरीही हा समाज त्याच मार्गाने जाणार, याचा चुकीचा पायंडा या-आधीच त्यांना कुणीतरी घालून दिला आहे. मी ते सारं आता बदलू पाहत आहे. पण या समाजाने डोळ्यावर चढवलेला रूढींचा चष्मा त्यांना अंध करून गेला आहे. तो त्याच चाकोरीत फीर फीर फिरतोय, त्याबाहेर जाण्याची त्याला अक्कल आलेली नाही.

     पण या समाजासाठी इतके करूनही, अगदी तन - मन अर्पुनही, त्यास याची काहीही जाणीव नाही. माझे विचार त्याला  पटत नाही, माझी कळकळ, तळमळ त्याला उमजत नाही. त्याला सत्याची, खऱ्याची ओळख नाही, जाण नाही, जिवंतपणीच माझ्या स्वतंत्र विचारांना त्याने  मरण दिले आहे. त्यांना जमिनीत गाडून टाकले आहे. माझ्या जिवंतपणीच माझे मृत कलेवर मी त्यांच्या  खांदी असहाय्यपणे पाहत आहे. माझे मनही हे सगळे पाहून अगदी निर्जीव झाले आहे, त्याच्यातला जिवंतपणा नाहीस होऊन तेही मृतप्राय  भासत आहे. ऐकूया तर आजच्या समाजाची ही विदारक वास्तव कविता. कवितेचे शीर्षक आहे- "माझेच कलेवर मी पहातोय !"


                               वास्तव-जीवन कविता

                          "माझेच कलेवर मी पहातोय !"
                         ---------------------------


झाले इतके थोडे-का झाले
अपमानाच्या आगीत नख-शिखांत जळतोय
नको हे लाजिरवाणे जिणे,
त्याहून बरे कायमचेच जाणे.

     खूप काही केलयं मी
     खूप काही दिलयं मी
     समाजाने जिवंतपणीच मारलंय मला,
     रक्त-बंबाळ केलयं सुकुमार मनाला.

ओळख नाही पटत सत्याची
दवंडी पेटतेय जिथे-तिथे असत्याची
विचार माझे ज्वालाग्राही भासतात,
आचार माझे आसुरी वाटतात.

     दिशाज्ञान दिले, तर दिशाभूल ठरते
     आज येथे सत्याचेच मरण ओढवते
     जीव तळमळतोय रे तुमच्यासाठी,
     चुकीच्या मार्गाने जाताय पाठी.

आज पुरेपूर हरलोय मी
आज कळून चुकलोय मी
भीषण हासत, विषण मनाने,
या ढोंगी समाजाच्या खांद्यावरले,
     माझेच कलेवर मी पहातोय !


-----श्री अतुल एस परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-21.07.2021-बुधवार.