बकरी-ईद चारोळया-"बकरी-ईदच्या पावन पर्वाला, गळा -भेटी घेऊ चला."

Started by Atul Kaviraje, July 21, 2021, 02:52:49 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                   बकरी-ईद चारोळया
"बकरी-ईदच्या पावन पर्वाला, गळा -भेटी घेऊ चला."
----------------------------------------------

(१)
सण आहे आज पावन बकरी-ईदचा
एकत्र येण्याचा,स्नेहाचा, गळा-भेट घेण्याचा
बंधू - भाव मुस्लिम समाजाचा,आनंदे जपण्याचा,
ईद-का-चांद, काळोख्या अस्मानी सलामे पहाण्याचा.

(२)
मुस्लिम बंधू येति एकत्र भाई-चारा नात्याने
अल्लाची मशीद जाते भरून त्यांच्या येण्याने
घोष होतो पवित्र कुराणाचा त्यांच्या पठणाने,
वातावरण भारले जाते जल्लोषाने, उत्साहाने .

(३)
हजरत  इब्राहिमचा त्याग माहित आहे सर्वा
बलिदानाची कथा विदित आहे सर्वा
त्या त्याग, बलिदानाची आहे ही ईद,
ओळखली जाते नावानेही "बलिदानाची ईद".

(४)
प्रसाद वाटती प्रेमे बकऱ्याच्या कुर्बानीचा
भक्षण होई, वाटाही असतो तो गोर-गरिबांचा
अमीर - गरीब  येथे नसतो भेद कधीही,
दिसते इथेही सर्व जणांत नेहमीच एकीही.

(५)
या-निमित्ते हिंदू-मुस्लिमांचे ऐक्य घडू दे
अनोखा सोहळा या ईदला डोळा पाहू दे
भाई-चाऱ्याने वागूया, बंधुत्त्वाची भावना ठेवूया,
एक होऊया, एक राहूया, एकमेकां नित जपूया.


-----श्री अतुल एस परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-21.07.2021-बुधवार.