सायंकालची कविता - "आगळया संध्याकाळचे वेगळे रूप"

Started by Atul Kaviraje, July 21, 2021, 07:33:30 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

मित्र/मैत्रिणींनो,
     
     पुन्हा एकदा  एका अनोख्या सायंकाळचे चित्रण. हवी-हवीशी  वाटणारी ही काहीशी वेगळी संध्याकाळ मनाशी नाते जोडून जाते. मनात तिचे चित्र कायमचेच साठवत जाते, तिचा आगळा-वेगळा ठसा उमटवत जाते. ती उदास करीत नाही, तर उत्साहाचे , समाधानाचे भरभरून अक्षय-पात्र आपल्याला देऊ करते. उद्याच्या सळसळत्या जीवनाची आज मी एक नांदी आहे, हे ती सांगून जाते. हे सकाळ-संध्याकाळचे  चक्र असेच निरंतर, अविरत सुरु राहील. या सायंकाळचा मी आज एक साक्षीदार आहे. ऐकुया तर हे आजच्या संध्याकाळचे कवितारूपी चित्रण. कवितेचे शीर्षक आहे-"आगळया संध्याकाळचे वेगळे रूप"


                        सायंकालची कविता
               "आगळया संध्याकाळचे वेगळे रूप"
              --------------------------------
                       

संध्याकाळ  रोजच  येत  असते
सांज -गारव्याने  अंगी  शिरशिरी  उठते
राईतल्या  तिरीपीची  मावळती  किरणे ,
संध्या -छायेशी  खेळ  खेळू  लागतात .

आजची  सायंकाळ  काही  वेगळीच  आहे
भरभरून  काहीतरी  देत  आहे
दिवसभराचा असलेला  थकवा -शिणवटा,
शीतल  वाऱ्यासवे  दूर  करत  आहे .

या  संध्याकाळचे  अनोखे  रूप
आज  मी  डोळ्यांत  साठवत  आहे
नि:स्तब्ध ,नि:शब्द  मम्  अंतरी ,
तिचा अंतर्भाव  होत  आहे .

ही संध्याकाळ काहीतरी सुचवत  आहे
जीवनाचे सूत्र सांगत आहे
म्हणतेय ,टाकून द्या मळभ आज जीवनाची,
अन वाट पहा उद्याच्या सळसळत्या प्रकाशाची.


     शुभ सायंकाळ, मित्र/मैत्रिणींनो.


-----श्री अतुल एस परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-21.07.2021-बुधवार.