कोरोना वास्तव चारोळ्या - "तिसऱ्या लाटेचे तृतीय चरण, घरोघरी सुरु झालेय लसीकरण"

Started by Atul Kaviraje, July 22, 2021, 01:03:42 AM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                    विषय - घरोघरी लसीकरण
                     कोरोना वास्तव चारोळ्या
  "तिसऱ्या लाटेचे तृतीय चरण, घरोघरी सुरु झालेय लसीकरण"
                                (भाग-१)
  ---------------------------------------------------


(१)
कोरोनाचे  लागताहेत घरोघरी नकोसे चरण
नकोय कुणालाही आता फुकटचेच मरण
प्रारंभा होई कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचे तृतीय चरण,
घरोघरी सुरु झालेय आता हवे - हवेसे लसीकरण.

(२)
प्रथम, द्वितीय, तृतीय, चतुर्थ, पंचम
लाटांवर लाटा नुसत्या येतच राहतील
भविष्य अंधारमयच, गणना करायची थांबवूया,
प्रत्येक लाटेगणिक, लसीकरण करत राहूया.

(३)
आज घराघरात पोहोचलीय पवित्र-लस
तिला आज देवाचे स्थान प्राप्त झालेय
घराघरांतून आरतीच्या गजरात, तिला ओवाळून,
तिचे अढळ स्थान आता कायम झालेय.

(४)
अपंगांचा, वृद्धांचा, स्त्रियांचा, बालकांचा
विचार केलाय सर्वांचाच सरकारने सर्वतोपरी
सुरक्षा  मिळण्या  तिसऱ्या लाटेपासून  कोरोनाच्या,
सुरक्षा-लस पोहोचवलीय दारो-दारी, घरो-घरी.

(५)
गल्ली सजलीयं पताकांनी , मोहोल्ला चमकतोय रोषणाईने
उंबरठा नटलाय रांगोळीने , दार उजळतंय तोरणाने
वाजत-गाजत येतेय मिरवणूक, जीवन-दात्या लसीची,
हात जोडून पूजा होतेय, घरोघरी वरद -दात्या देवीची.


-----श्री अतुल एस परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-22.07.2021-गुरुवार.