चहा आणि तू!!❤️

Started by Vedanti Nimbre, July 22, 2021, 03:45:32 PM

Previous topic - Next topic

Vedanti Nimbre

एक कटींग चहा पिऊया
तुझ्या माझ्या प्रेमाचा
सदैव गोडवा राहील त्यात
तुझ्या माझ्या ओठांचा😘

सुखाचा क्षण असतो
आणि ताजेपणा येतो
जेव्हा माझ्या चहाला
तुझा स्पर्श भासतो💕

एक इच्छा पूर्ण व्हावी
तुझ्यासोबत चहा प्यावी
नकळत हरवून तुझ्या नजरेत
सकाळची संध्याकाळ व्हावी😌

प्रश्न नको करू मला
तुला ' चहा की मी ' आवडतो  ??
तुझ्यासोबत जगण्याचा
आनंद मला वेडावतो...💙
                  - वेदांती निंबरे



Yogesh9889


Rohan Rajendra Bhosale

खूप छान कविता आहे. माझं यूट्यूब वर चॅनल आहे. "प्रेम काव्य" नावाने. त्यावर मी माझे आणि बरेच कवी आणि कवियित्री चे कविता व्हिडिओ मार्फत प्रदर्शित करतो त्यांच्या नावासहित. तुम्ही इच्छुक असाल तर मला ७७७७०९२२९७ ह्या नंबर वरती तुमची कविता पाठवू शकता.