विवाह कविता - " पवित्र विवाहाच्या या बंधनात,आड येतंय लव्ह जिहादचे बंधन"

Started by Atul Kaviraje, July 22, 2021, 11:36:46 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

मित्र/मैत्रिणींनो,

     दिनांक-१८.०७.२०२१-रविवार, रोजी, मराठी वृत्त-वाहिनी, बी बी सी न्यूज मराठी, या मराठी यु-ट्यूब चॅनेलवर पुढील बातमी व्हिडिओद्वारे दाखविण्यात अली होती. ती जशीच्या तशी त्याच शब्दांत मी पुढे मांडत आहे -  "Maharashtra Hindu Muslim Marriage: "लव्ह जिहाद"  च्या नावाखाली नाशिकमध्ये का रद्द करावं लागलं हे लग्न? रसिका आणि आसिफ अतिशय आनंदात होते. 8 वर्षांच्या मैत्रीनंतर त्यांनी लग्न करायचं ठरवलं होतं, मोठ्या प्रयत्नांनी घरच्यांची संमती मिळवली होती, तारीख ठरली, पत्रिका वाटल्या गेल्या पण ऐनवेळी या लग्नात लव्हजिहादच्या नावाखाली विघ्न आणलं गेलं. लग्न रद्द करावं लागल्यामुळे दोन्हीकडच्या कुटुंबांना धक्का बसला आणि मानसिक त्रास झाला. दोघांचं कोर्ट मॅरेज झालंय पण तरी दांपत्याची इच्छा आहे की आपलं वैवाहिक जीवन सुरू होण्याआधी दोन्ही धर्मांच्या पद्धतीने लग्न व्हावं. लग्नाचा निर्णय भावनेच्या भरात किंवा एका दिवसात घेतला नाही असंही आसिफ सांगतात."   

     मित्रांनो, लग्नाचे सर्व सोपस्कार पूर्ण झालेत, दोन्ही समाजाकडून या लग्नाला पूर्ण संमती आहे, पत्रिकाहि  छापून  झाल्यात, आणि याच वेळी, हा समाज, समाजातले काही धर्मांध, लव्ह जिहाद च्या नावाखाली हे होणारे लग्न चक्क रोखू पाहताहेत. काय चाललंय समाजात ? तो असे का वागतोय ? जाती पातींचे बंधन मोडून लग्न बंधनात बांधल्या जाणाऱ्या या नवं-परिणीत वधू-वरांचा  यात काय दोष ? भावी संसाराची सुखी स्वप्ने त्यांची अशी भंगून जातील ? राजा राणीचा त्यांचा संसारातील डाव असा अर्ध्यावरच मोडून जाईल ? मित्रांनो, तुम्हीच विचार करा, हा क्रूर समाज या जाती-पतींच्या अनिष्ट रूढी  अजून का पाळतोय ?

     असो, हा समाज बदलेल तेव्हा बदलेल, पण असे अनेक आसिफ आणि रसिका, या जाती - पातींच्या  अनिष्ठ जात्यात, क्रूरपणे दळले जाताहेत. त्यांची यातून केव्हा सुटका होईल ? आताच सांगता येत नाही. पण या परिस्थितीत बदल होणे गरजेचे आहे, काही समाज हिताच्या लग्न संस्थांनी एकत्र येऊन हि विष-वल्ली समूळ उखडून टाकण्याचा वसा घेण्यास हवा, व तात्पर्याने भावी वधू-वरास लग्न-शुभेच्छा द्यावयास हव्यात. या गंभीर समस्येवर एक कविता ऐकवितो, कवितेचे शीर्षक आहे - " पवित्र विवाहाच्या या बंधनात,आड येतंय लव्ह जिहादचे बंधन"


                              विवाह कविता
    " पवित्र विवाहाच्या या बंधनात,आड येतंय लव्ह जिहादचे बंधन"
    ------------------------------------------------------


नजरेला  नजरेने  बांधले  केव्हातरी
नकळत  वाढली  धडधड  उरी
भेटीगाठी  नंतर  होतंच  राहिल्या ,
प्रेम-लाटांत त्या तरंगू  लागल्या .

८  वर्षांच्या  प्रदीर्घ  मैत्रीनंतर
आसिफ  रसिका आणिक जवळ आले होते
प्रेम -पाशात  जखडून , प्रेम-धाग्यात  गुंफून,
प्रेम-वसन , उत्कट  प्रीतीचे  विणू  लागले होते.

आणा -भाका  झाल्या होत्या घेऊन
झाली होती  पार  प्रेमाची परिसीमा
स्वप्ने  पाहू लागली  दोघे  सुखी  संसाराची,
आनंदा  नव्हता  त्यांच्या  पारावर  अन सीमा .

पुढची  पायरी  गाठून  तयांनी
साध्या  पद्धतीने  (कोर्ट  मॅरेज ) विवाह  केला
मात्या -पित्याच्या अन वडील -धाऱ्यांच्या आशिषानें
प्रारंभ  करू लागले  दोघे  नव-जीवनाला .

आज जाती  पातींचे  विसरून  बंधन
दोघे  एक  झाले, एकत्र  आले होते
मनासारखे  घडत  होते, याच  आनंदात,   
आजवर जोपासलेले  प्रेम तयांचे अधिकच  फुलले होते.

रीतसर  लग्नास  त्यांनी  घेतली  होती परवानगी
संस्कृती  होती बाणली  त्या दोघांच्याही  अंगी
लग्न -संस्कार , अनुकूल  धर्मानुसार  व्हावे,
प्रयत्नशील  होते दोन्ही समाज, तयारीत  होते जागे .

पत्रिका गेल्या छापल्या रीतसर, दोघांच्या विवाह-परिणयाच्या
निमंत्रणा  बोलावले  सर्वांस, जातीने हजर  राहण्याच्या
लग्न आले तोंडावर, दोन्ही कुटुंबे होती आता समाधानी,
वेग घेतला होता नवं-परिणितांच्या संसाराच्या भावी स्वप्नांनी.

पण अवचित काहीतरी आले होते संकट दोन्ही पल्याड
तीच जाती-पतींची नकोशी दीवार  येऊ पहात होती आड
धर्मांधांनी समाजाच्या या विवाहास विरोध पहा दर्शविला,
"लव्ह-जिहादा"च्या नावाखाली आपला नकाराचा शिक्का उमटविला.

लग्न होते वास्तविक रीतसर, समंतीनेच होत होते दोघांच्या
तक्रार नव्हती, बळजबरीही नव्हती, विरोधही नव्हता कोणाचा
परि,झापडे चढवून आले होते, धर्मांध ,पट्टी होती डोळ्यांवर,
"लव्ह-जिहाद" नावाखाली त्यांनी निर्बंध घातला या लग्नावर.

पहाता पहाता संसाराची सुखी स्वप्ने विस्कटुनच गेली
अजून त्यांच्या भावी संसाराची सुरुवातच नव्हती झाली
आसिफ रसिकांच्या डोळ्यांतील पाणी नव्हते थांबत ,
या क्रूर समाजानेच आणली होती या दोघांत फारकत.

दोन प्रेमी जीव एकत्र कधीही न यावेत का ?
जाती -पातींचे बंधन  फक्त त्यांनाच असावे का ?
जोवर आहेत या अनिष्ठ रूढी समाजाने खत-पाणी दिलेल्या,
तोवर दिसतील या प्रेम-वृक्षाच्या फांद्या नेहमीच सुकलेल्या.

असे वेगळे करून या समाजास अंती काय मिळाले ?
सुखी संसाराचे त्यांचे स्वप्न पहाता पहाता असे भंगले
ऐकून हे वृत्त मन माझेही विषणण झाले, दुःखी झाले,
केव्हातरी बदलेल हा समाज, याच विचारात मग्न झाले.


-----श्री अतुल एस परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-22.07.2021-गुरुवार.