मिष्कील चारोळ्या-" चाळीतल्या नळावर पाण्यावरून होणारे वाद "-भाग-१

Started by Atul Kaviraje, July 24, 2021, 02:31:13 AM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                      मिष्कील चारोळ्या
     " चाळीतल्या नळावर पाण्यावरून होणारे वाद"-भाग-१
    -----------------------------------------------

१)  आयुष्य अर्धे कौटुंबिक वादात गुजरले
     उवर्रीत चाळीच्या सार्वजनिक नळी संपले 
     इतिश्री इथे जीवनाची होत,
     दुसरे काहीही नाही करता आले.

२)  पाणी आलयं, बादल्या भरून घ्या
     ओरडली चाळीतील काही वर्तमान-पत्रे
     एक घाई सर्वांस पाणी भरण्याची,
     मध्येच लुडबुडत होते दोन-चार कुत्रे.

३)  प्रत्येक गल्लीत असतो दादा
     आमच्या नळावरही आहे एक
     नंबर पहिला देऊन प्रत्येकास,
     उकळलेत आजवर हप्ते अनेक.

४)  बायको म्हणाली, म्हातारे झालात
     तुमच्याकडून काम होत नाही धड
     नळावर जाऊन लाईन लावा रात्रीच,
     तिथेच पसरून पथारी, टाका धड.

५)  नंबरवरून नळावर होतात वाद
     वादाचा नंतर होतो प्रतिवाद
     राग बादलीवर काढला जातो यात,
     भांडण वाढत जाऊन, होते मात्र रात.


-----श्री अतुल एस परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-24.07.2021-शनिवार.