देव हनुमान भक्ती-गीत - " हुप्पा हुय्या जय बजरंगा "

Started by Atul Kaviraje, July 24, 2021, 03:03:07 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                               II जय श्री हनुमान II

   मित्र/मैत्रिणींनो,

     आज शनिवार,  देव हनुमानाचा वार , एक भक्ती-गीत आपल्यापुढे प्रस्तुत करीत आहे. सदर  हनुमानाचे गीत हे वास्तविक "हुप्पा  हुय्या  " या  मराठी  आगामी  चित्रपटातील  असून , त्याचे  संगीत श्री.अजित परब  यांनी  दिले  असून , या  गाण्याचे  गायक  आहेत , श्री  स्वप्नील  बांदोडकर.  या  गाण्याचे  बोल  आहेत  - " हुप्पा  हुय्या  जय  बजरंगा ".

     ऐकुया तर मित्रांनो, हे भक्ती-गीत. --------

     हुप्पा हुय्या हे गीत हुप्पा हुय्या या चित्रपटा मधले असून या गीता चे गायक स्वप्नील बांदोडकर हे आहेत. ह्या  गीताला संगीत अजित परब यांनी दिले आहे.--------

     गाण्याचे शीर्षक :हुप्पा हुय्या
     चित्रपट:     हुप्पा हुय्या
     गायक:     स्वप्नील बांदोडकर
     संगीत:     अजित परब
    -----------------------------

हुप्पा हुय्या जय बजरंगा.......
भीमरूपी महारुद्रा वज्र हनुमान मारुती
वनारी अंजनीसूता रामदूता प्रभंजना
जय हनुमान जय जय हनुमान......
जय जय......

राम दासा च्या पुण्याईची काय सांगू महती
अकरा गावी प्रकट झाले अकरा मारुती.....
कुणी लंका जाळली....
कशी सीता मिळाली
कुणी आणली संजीविनी.

आई कुणाची अंजनी
कशी सीता मिळाली
कुणी आणली संजीविनी
आई कुणाची अंजनी.

रामाचा भक्त ऐसा, वाऱ्याचा पुत्र ऐसा
उडवी दाणा दाण, शत्रूची उडवी उडवी दाणा दाण
तेच्या  हृदयी सीताराम
बोला जय हनुमान
जय हनुमान.......

जय बजरंग जय हनुमान जय बलभीम जय जय श्री राम.....
मारुती चुन्याचा असे शहापूराचा
उग्र चेहऱ्याचा गोंड्याच्या टोपीचा...
हा मसूरचा हनुमान देखणा छान
होता दर्शन तयाचे लागते ध्यान.

चाफडचा दास मारुती मुद्रा भक्तीची
प्रताप मारुती वीर मूर्ती शक्तीची
शिंगणवाडीच मंदिर उंच ते फार
बाल मारुती गोजिरा भक्ता आधार
त्या उंब्रज गावी दिसे सानुले रूप
चांदीचे डोळे देवाचे भावती खूप.

न्यायाच्या हक्कासाठी बजरंग हा राही पाठी
विजयाचे निशाण देई तो विजयाचे निशाण
तेच्या हृदयी सीताराम
बोला जय हनुमान
जय हनुमान.......
जय बजरंग जय हनुमान जय बलभीम जय जय श्री राम.....
जय जय......

गोड्याच्या तोंडाची मूर्ती माजगावची
झाली समर्थांच्या हाती स्थापना त्याची
कृष्णाकाठी बहे निसर्गाचे देण
श्री रामासाठी धावले हनुमान.

कौलारू मंदिर आणि वाहता ओढा
मन पाडळ्याला हो पडे भक्तांचा वेढा
सपाट दगडावर कोरली छान
आहे पर्गागावची मूर्ती ती लहान
आहे देऊळ सुंदर बत्तीस शिराळा
तिथे सूर्यदेव येती हो दर्शनाला.

आणाया रामराज त्या बजरंगाच आज
करूया जय जयकर गाऊया गोड मुखाने नाम
तेच्या हृदयी सीताराम
बोला जय हनुमान
जय हनुमान.......
जय बजरंग जय हनुमान जय बलभीम जय जय श्री राम....

चुकल्या आयुष्याची दिशा शोधून दे हनुमान
जीवंत असुनी मेलेल्या दे संजिवनी आणून
कुविचार जे मनातले तू जाळी त्याची लंका
विश्वास दे प्रकाश दे वाजण्या यशाचा डंका.

सूर्याचा करी घास, वीरांचा वीर खास
करितो जो उड्डाण देव मग घालितो थैमान
तेच्या हृदयी  सीताराम
बोला जय हनुमान
जय हनुमान.......

जय बजरंग जय हनुमान जय बलभीम जय जय श्री राम.....
जय जय.......
हुप्पा हुय्या जय बजरंगा.


-----संकलन
-----श्री अतुल एस परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-24.07.2021-शनिवार.