सूर्यदेव कविता - "देवा हो देवा सूर्य देवा"

Started by Atul Kaviraje, July 25, 2021, 02:31:41 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                             II ओम सूर्याय नमः II

मित्र/मैत्रिणींनो,

     आज रविवार, म्हणजे त्या तळपत्या, उजळत्या, सर्व चरा-चरांस प्रकाश, उजेड, जीवन देणाऱ्या भास्कराचा, प्रभाकराचा दिन, त्या दिनकरास मी माझी पुढील भक्ती-कविता अर्पण करीत आहे. माझ्या कवितेचे शीर्षक आहे- "देवा हो देवा सूर्य देवा"


                                   सूर्यदेव कविता
                              "देवा हो देवा सूर्य देवा"
                              ---------------------


देवा हो देवा सूर्य देवा
सोनेरी किरणांचा देतोस ठेवा
पक्षी, प्राणी नमिती तुजला
उपकार तुझे रे पृथ्वी मातेला
पक्षांचे ते सुंदर गाणे
मोहून घेतात सप्तसुराने,
देवा हो देवा सूर्य देवा.

पक्षी, विमाने भ्रमण करती
सुंदर सकाळी उत्साही दिसती
तूच दाता, भाग्यविधाता
सृष्टीचा रे पालनकर्ता,
देवा हो देवा सूर्य देवा.

नव्या पिढीला तुझे आवाहन
आळस दया रे सारा झटकून
सौर उर्जेचा करावा आधार
उर्जेचा जपून करा वापर,
देवा हो देवा सूर्य देवा.

रवि राजा तू द्यावी शिकवण
सर्वांसाठी असावे सर्वजण
मुक्त करावे रोगराईतुन
सर्वाना आरोग्य मिळावे छान,
देवा हो देवा सूर्य देवा.

जगावर तुझे थोर उपकार
सुखी ठेवतो, लहान थोर
असे तुझे कार्य महान
मानवा तुझे नित्य स्मरण,
देवा हो देवा सूर्य देवा.


     (साभार आणि सौजन्य - स्टोरी मिरर.कॉम)
   ----------------------------------------


-----संकलन
-----श्री अतुल एस परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-25.07.2021-रविवार.