शिव शंकर भक्ती-गान-"हे भोळ्या शंकरा, आवड तुला बेलाची"

Started by Atul Kaviraje, July 26, 2021, 10:51:32 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                           II ओम नमः शिवाय II

मित्र/मैत्रिणींनो,

     आज श्री शंकराचा वार, सोमवार. आज मी तुम्हाला शंकराचे एक भक्ती गीत ऐकवीत आहे. फारच लोकप्रिय असे हे गीत, याचे बोल आहेत - "हे भोळ्या शंकरा, आवड तुला बेलाची". सदर गीत श्री श्रावण बाबा यांनी रचले असून त्याचे गायक विजय सरतापे आहेत.


                          शिव शंकर भक्ती-गान 
                 "हे भोळ्या शंकरा, आवड तुला बेलाची"
               ------------------------------------


हे भोळ्या शंकरा हे भोळ्या शंकरा
आवड तुला बेलाची बेलाच्या पानाची
हे भोळ्या शंकरा ..

गळ्या मध्ये रुद्राक्षाच्या माळा
लावितो भस्म कपाळा
आवड तुला बेलाची बेलाच्या पानाची
हे भोळ्या शंकरा ..

त्रिशूल डमरू हाती
संगे नाचे पार्वती
आवड तुला बेलाची बेलाच्या पानाची
हे भोळ्या शंकरा ..

भोलेनाथ आलो तुमच्या द्वारी
कोठे दिसे ना पुजारी
आवड तुला बेलाची बेलाच्या पानाची
हे भोळ्या शंकरा ..

हाता मध्ये घेउन झारी
नंदIवरी करितो सवारी
आवड तुला बेलाची बेलाच्या पानाची
हे भोळ्या शंकरा ..

माथ्यावर चंद्राची कोर
गळ्या मध्ये सर्पाची हार
आवड तुला बेलाची बेलाच्या पानाची
हे भोळ्या शंकरा ..


          ====================
              भक्ती  गीत :   हे  भोळ्या  शंकरा
              अल्बम :        हर हर  भोले  शंकर
              गीतकार :      श्रावण  बाबा
              संगीतकार  :   अशोक  वैंगणकर   
              गायक  :        विजय  सरतापे
          ====================


     (साभार आणि सौजन्य-हिंदी भजन लैरिक्स .कॉम .इन)


-----संकलन
-----श्री अतुल एस परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-26.07.2021-सोमवार.