राज-कारण गंभीर कविता-"फुटीरपणा तुम्ही बंद करा, आपल्या पक्षाशी एकनिष्ठ रहा !"

Started by Atul Kaviraje, July 26, 2021, 11:40:04 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje


मित्र/मैत्रिणींनो,

     युद्धात आणि प्रेमात सारं क्षम्य आहे असे म्हणतात. मला तर आज-कालचे राज-कारण पाहून असे वाटू  लागले आहे, कि राज-कारणातही तर खूपच आणि सारंच क्षम्य आहे. मित्रांनो, राज-कारणातील एक गंभीर अशी समस्या  प्रत्येक पक्षाला भेडसावू लागली आहे, ती म्हणजे फुटीरतेची. एका पक्षातून दुसऱ्या पक्षात जायचे, तर कधी तिसऱ्या पक्षातून पहिल्या पक्षात पुन्हा यायचे, असा हा कार्यकर्त्यांचा फुटीरपणा  जवळ जवळ रोजच या राज-कारणात दिसून येत आहे. एकनिष्ठतेची  पवित्र गाठ,पवित्र  बंधन बांधूनही, पवित्र शपथ घेऊनही, असं हे राज-रोस चालले आहे. त्यामुळे असे होते कि या फुटीरपणामुळे, तो पक्ष अक्षरशः खिळखिळा होऊन जातो, त्याची ताकद कमी होते, व अंती तो पक्ष डबघाईस येतो.

     थोडक्यात काय, तर आज स्वच्छ होऊ घातलेलं राज-कारण पुन्हा एकदा गलिच्छ झाल्याचे दिसून येत आहे. कार्य करायचंय, तर पूर्णपणे निष्ठेने, प्रामाणिकपणे करा, एक-निष्ठतेने करा. त्याला या फुटीरतेचा ,अमंगळाचा स्पर्श ही नसावा. इतके ते स्वच्छ असावे. असं जर यापुढे घडले, तर प्रत्येक राज-कारणी पक्ष हा पुन्हा एकदा नव्या ताकदीने, नव्या जोमाने पुढे येऊन  कार्यरत होईल, जनतेच्या सर्व समस्या सोडवील व जनता त्यांची एकी पाहून संतुष्ट होईल, व पर्यायाने त्याला एक खरे राज-कारण म्हणता येईल.असो, या वरील फुटीरतेचे राज-कारण या विषयावरील एक गंभीर कविता ऐकुया. कवितेचे शीर्षक आहे-"फुटीरपणा तुम्ही बंद करा, आपल्या पक्षाशी एकनिष्ठ रहा !"


                         राज-कारण गंभीर कविता
         "फुटीरपणा तुम्ही बंद करा, आपल्या पक्षाशी एकनिष्ठ रहा !"
       ------------------------------------------------------


वाद काय होतंच असतात एकमेकांत
मनुष्याचे ते आहे एक स्वभाव-वैशिष्ट्य
पण म्हणून का ते कधी विभक्त होतील ?
नाही वाटत, माणसात असेल एवढे धारिष्ट्य !

पण आपला हा अटकळ आहे साफ चुकीचा
अंदाज नाही आलाय कधी या गोष्टींचा
राज-कारणच आहे अशी एक डगमगती वाट,
अभावच असतो यात सुरळिततेचा, सरळतेचा.

शपथा वहिल्या जातात अनेक, पक्ष्यांत
एकनिष्ठ राहू, म्हणती सारे एका दमात
पण यानंतरचे सारे अतर्क्यच असते,
घटित सारे अविश्वसनीयच असते.

राज-कारणाचे सारे रूप पालटलंय आजच
अरुप होतंय, घडतंय कार्य-कारण फुटीरतेच
एकनिष्ठ असणारे, घनिष्ठ राहणारे, पक्ष्या त्यजून,
मार्गक्रमण करताहेत दुज्या पक्ष्याचं.

यापाठी असतीलही अनेक कारणे
का सोडतील ते एक पक्ष अकारणे 
नेमकं काय घडतेय थांगपत्ता नसतो,
सामान्य जाणून घेण्या कधी तयार नसतो.

शपथ वाहिलेल्या एका पक्ष्याची, नाळ तोडून
दुसऱ्या पक्ष्याची मनगटी कंकणे बांधायची
दुसऱ्या पक्ष्याला अवाक आश्चर्यात ठेवून,
तिसऱ्याच्या उपरण्याची गाठ बांधायची.

अंती याचा होतो परिणाम राज-कारणावर
नीट घडीचे, एकसंध ते नाही रहात
सततच्या फुटीर धोरणामुळे त्याचे,
घनत्व पहाता-पहाता विरून जातं.

मार्गात येत रहातो  नित्य अडथळा
मनुष्य-बळाचा अभाव असतो कारणी-भूत
एका पाठोपाठ एक सोडून चालले तर,
नेत्यांना खेळत बसावे लागेल द्यूत !

फुटीरतेचा राक्षस असा का घोंघावतोय ?
यापाठी पण डाव का राज-कारणाचाच असतोय ?
एक राज-कारण खेळता, दुसरे खेळले जाते,
शह कोणास आणि मात कोणाची, सारेच चितपट होते.

या अमंगळाचा स्पर्शही होऊ नये राज-कारणास
स्वच्छ,निर्मल,नितळ ते लखलखीत असावे
फुटीरतेच्या दानवास स्वहस्ते देऊन बळी,
शपथ वाहिलेल्या पक्ष्याशी एकनिष्ठ रहावे.

उगीच मृग-जळामागे धावून फुका
हातचे सोडून पळत्याच्या पाठी जाऊ नये
आज न उदया तुमचे इथेच आहे कल्याण,
राहावे प्रामाणिक, विश्वासार्हतेचे देऊन प्रमाण.

पहा मग कसे स्वच्छ दिसेल राज-कारण
जन-हितासच तुम्ही आला आहात एकत्र
चला सारे एकजुटीने करूया काम,
फूट नको, एकीच्या बळातच आहे राम.


-----श्री अतुल एस परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-26.07.2021-सोमवार.