श्री गणेश गीत - "या रे या सारे या, गजाननाला आळवूया"

Started by Atul Kaviraje, July 27, 2021, 11:06:31 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                              II श्री गणेशाय नमः II


मित्र/मैत्रिणींनो,

                        "या रे या सारे या, गजाननाला आळवूया"
                      ------------------------------------

    प्रियांका चोप्राची प्रस्तुती असलेल्या "व्हेंटिलेटर" या चित्रपटातील हे गाणे. घरातील ज्येष्ठ व्यक्ती आजारी पडल्यानंतर एकत्र आलेले कुटुंब.. एकमेकांपासून दुरावलेली मन एकत्र येताना घडणाऱ्या गोष्टी यात दाखवण्यात आल्या आहेत. बाप्पावर अपार श्रद्धा असलेलं हे कुटुंब दुरावा असूनही कसं एकत्र येतं हे यात दाखवण्यात आले आहे. चित्रपटातील एका प्रसंगी हे गाणं दाखवण्यात आलं आहे. मुंबईत बाप्पाची जंगी मिरवणूक काढली जाते. बाप्पाचे दर्शन घेण्यासाठी परदेशातूनही या गणेशोत्सवाच्या काळात लोकं येतात. हे या गाण्यातून दाखवण्यात आले आहे. मल्टीस्टारर कास्ट असलेल्या या चित्रपटात आशुतोष गोवारीकर यांची महत्त्वाची भुमिका आहे. ऐकुया आजच्या "अंगारकी संकष्टी चतुर्थी "च्या शुभ मुहूर्तावर  हे लोकप्रिय गणेश भक्ती - गीत. गाण्याचे बोल आहेत - "या रे या सारे या गजाननाला आळवूया" -----------


या रे या सारे या
गजाननाला आळवूया
नाम प्रभूचे गाऊया
गणपती बाप्पा मोरया,
मंगलमूर्ती मोरया.

गुणगान तुझे ओठांवर राहू दे
चरणी तुझ्या हे जीवन वाहू दे
नाथांचा नाथ तू, मायेची हाक तू,
भक्तीचा नाद तू, माऊली तुझी दया.

उपकार तुझे सुखदायक सुखकर्ता
आधार तुझा तू तारण करता
तू माता, तूच पिता
तू बंधू, तूच सखा,
आम्हावरी राहू दे माऊली तुझी दया.


               ===========================
                   संगीत : रोहन -रोहन
                   गीतकार : मनोज  यादव आणि  शांताराम  मापुस्कर
                   गायक : रोहन  प्रधान
                   चित्रपट : व्हेंटिलेटर
                   प्रस्तुती : प्रियांका चोप्रा
                   महत्त्वाची भूमिका : श्री आशुतोष गोवारीकर
               ============================

               (सौजन्य -  मराठी .पॉप एक्स ओ .कॉम )
              -------------------------------------


-----संकलन
-----श्री अतुल एस परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-27.07.2021-मंगळवार.