वास्तव-वादी गंभीर कविता-"जन्म यासाठीच द्यायचा का ?"

Started by Atul Kaviraje, July 28, 2021, 01:27:21 AM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

मित्र/मैत्रिणींनो,

     जिथपर्यंत  "अबौर्शन ", गर्भ -पात  होत  होते  तिथपर्यंत  ठीक  होते . ( तेही  रीतसर -डौक्टरांच्या  सल्ल्यानुसार -अधिकृत  इस्पितळांतच ), पण  अविकसित  गर्भ -भ्रूणाला  असे  उकिरड्यावरच  फेकून  देणे , यासारखे  दुसरे  पातक  ते  काय  ? या  अर्ध -विकसित  कळ्यांचे  भवितव्य  काय  ? त्यांना  यासाठीच  जन्म  द्यायचा  का ? असे अनेक अनुत्तरित  प्रश्न . यांची उत्तरे कधी आणि कशी  सापडतील ?

     आपली  शरीर -भूक , वासना  शमविण्यासाठी  पाप  करायचं , आणि  मग  गर्भ  राहिला ,की  हे  पाप  लपविण्यासाठी ,त्याची  अकालीच  हत्या करायची , या  भ्रूणाच्या  गळ्याला  नखे  लावायची . आणि  जर  यातूनच  त्या  अभागी , हतभागी  जीवांना  चुकून  जन्म  मिळालाच  तर  त्यांची  रवानगी  अनाथ -बालकाश्रमात  करून  मोकळे  व्हायचे . शेवट  पर्यंत  त्यांचे  आई -वडील  कोण  हे  गुप्त  ठेवायचे .

     मित्रानो , तुम्हाला  वाटत  नाही  का  , की  हे  कुठेतरी  थांबायला  हवं , या  अनाथ   मुलांना  त्याच्या  आई -वडिलांचे  नावं  मिळावे , त्यांची  जोपासना , उत्तम  सांभाळ  व्हावा . त्यांचे  सुखकर  भविष्य  घडावे . असो , तर  या  गंभीर , वास्तव -वादी  समस्येवर , एक  कविता . कवितेचे  शीर्षक  आहे -"जन्म यासाठीच द्यायचा का ?"


                      वास्तव-वादी गंभीर कविता
                            गर्भ-भ्रूण हत्या
                    "जन्म यासाठीच द्यायचा का ?"
                   ---------------------------

आपले कृत्य निर्लज्य लपवून
हे-पाप उकिरड्यावर फेकायचे का ?
वासना शमवून अपूर्ण भ्रूणाला,
जन्म यासाठीच द्यायचा का ?

     वासना घाली पाप जन्माला
     कामासक्त लावती नखे गळ्याला
     काय पाप या अर्धविकसित कळ्यांचे ?
     जन्म त्यांना यासाठीच मीळावयाचा का ?

भ्रूण-हत्या हे पाप मोठे
या पाप्याना काय त्याचे ?
गर्भपात करुनी,चूक तारुण्यातील सावरूनी,
निष्पापांचे आयुष्य बरबाद करायचे का ?

     नुसत्या प्रेमाच्या या नावाखाली
     फक्त आहे शरीराचीच ओढ
     शरीर-सुखाच्या या तीव्र वासनेपोटी,
     या शरीराची अशी विटंबना का ?

अनाथ बालकांचे भवितव्य आजचे
आई-वडील कुठे, आहेत कुणाचे ?
उद्याचे कुणी काही सांगेल का ?
फडफडणाऱ्या या ज्योतींना ओंजळ हातांची मिळेल का ?


-----श्री अतुल एस परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-28.07.2021-बुधवार.