सद्याचे वास्तव चित्रण-"दरड कोसळली धडाधड डोंगरावरून,कोरोनाला गेले सारेजण विसरून."

Started by Atul Kaviraje, July 28, 2021, 02:25:51 AM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                             सद्याचे वास्तव चित्रण
                                गंभीर चारोळ्या
   "दरड कोसळली धडाधड डोंगरावरून,कोरोनाला गेले सारेजण विसरून."
                                         (भाग-१) 
  ---------------------------------------------------------------     


(१)
असेच आहे मानवी जीवन, हीच आहे व्याख्या
माणूस आहे तोच, परी वृत्ती नाहीत एक-सारख्या
एकाकडे डोळेझाक करून,दुसऱ्याकडे पाहण्याच्या त्याच्या सवयी,
गप्प राहू देत नाही त्याला, नित असती अनोख्या -असारख्या.

(२)
आता हेच पहा ना, दुसरे संकट डोक्यावर कोसळतय
पहिल्या संकटाची झळ पदोपदी, अजूनही सर्वत्र जाणवतेय
महापूर आलाय, दरडी कोसळू लागल्यात गावो-गावी,
कोरोनाचा कहर आता उरलाच नाही, माणसाच्या गावी.

(३)
बातमीदारही विसरूनच गेलेत जणू या कोरोना पँडेमिकला
बातमीला हात घातलाय त्यांनी नव्या विषयाला
सर्वत्र पुराचे अन डोळ्यांतील पाणीच पडद्यावर दिसतंय,
कोरोनाच्या रुग्णांचे अन लशींचे आता नाम-मात्रही नूरलय.

(४)
नवीन संकटांची नांदी, मोडतेय जुन्या संकटाची फांदी
एक संकट संपत नाही, तोवर येई दुसरे संकट
संकटांची मालिका केव्हातरी संपेल का भविष्यात ?
की मानवच उरणार नाही,दिसणार नाही पुढील आयुष्यात.

(५)
हात पोचताहेत मदतीचे, पूरग्रस्तांना मिळतोय दिलासा
लशींची आवक बंद झालीय, पेशंट रडतोय कोरोनाचा ढसाढसा
मंत्री,जंत्री धावताहेत, घेताहेत भेट, पूरग्रस्त विभागा,
कोरोना पुनः नव्या लाटेसोबत सुरु करतोय नाच नंगा.


-----श्री अतुल एस परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-28.07.2021-बुधवार.