विद्रोही विचार कविता-"मन विद्रोह करून उठलंय !"

Started by Atul Kaviraje, July 31, 2021, 01:35:07 AM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

मित्र/मैत्रिणींनो,
   
     माझी पुढील कविता जर तुम्ही नीट वाचली, तर मित्रांनो, तुमचंही मन विद्रोह करून उठेल. समाजाचे वास्तविक आणि विदारक चित्रण मी माझ्या या कवितेतून केले आहे. अराजक, भ्रष्ट्राचार, लाचलुचपत, सत्तेची भूक,त्यासाठी होणाऱ्या हत्या, जातीपातीची फोफावणारी विषवल्ली, अतिरेक्यांच्या घातपाती कारवाया, त्यापायी जाणारे नाहक बळी, एका देशाची दुसऱ्यावर मात, त्यापायी होणारे रक्तपात, दंगेधोपे, अन्याय,आणि बरंच काही.

     माझ्या या कवितेतून तुम्हाला हे सर्व प्रकर्षाने जाणवेल, आणि तुमचेही मन विद्रोह, बंड करून उठेल. ऐकुया तर, समाजाचे हे वास्तविक-विदारक ,गंभीर स्वरूप, कवितारूपी. कवितेचे शीर्षक आहे-"मन विद्रोह करून उठलंय !"


                              विद्रोही विचार कविता
                           वास्तव-वादी गंभीर कविता
                          "मन विद्रोह करून उठलंय !"
                   ---------------------------------


एकमेकांच्या जीवावर उठलेत पैश्यांसाठी
हत्या होतेय नाहक सत्तेसाठी
पशुसम वागताना पाहून माणसाला,
मन विद्रोह करून उठलंय.

     जातीयतेचे बीज विषारी लागलयं फोफावू
     दंगली उसळताहेत,आगडोंब पसरतोय
     पवित्र देवळांची शकले उडताना पाहून,
     मन विद्रोह करून उठलंय.

नाहक बळी जातोय एखाद्याचा
अतिरेक्यांच्या अंध सूडात्मक कार्यापायी
आप्तांचा त्यांच्यासाठी,आक्रोश ऐकून,
मन विद्रोह करून उठलंय.

     एका देशाची दुसऱ्यावर मात
     त्यासाठी होताहेत कित्येक रक्तपात
     वर्तन त्यांचे रक्तलांछित पाहून,
     मन विद्रोह करून उठलंय.

लाच-लुचपत,भ्रष्टाचार,दंगेधोपे,पिळवणूक
केव्हा येणार सुख-शांती अमन ?
बास झाले, झाले तितके नाही थोडे,
अन्यायाचे नाही चालणार यापुढे.
     मन विद्रोह करून उठलंय !
     मन बंड करून उठलंय !


-----श्री अतुल एस परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-31.07.2021-शनिवार.